नागपूरमध्ये एका मतदान केंद्रावर फेरमतदान

नागपूर – राज्य विधान परिषदेच्या नागपूर विभाग शिक्षक मतदार संघातील मतदान केंद्र क्रमांक २५ (मनपा मराठी प्राथमिक शाळा, क्रमांक १, नवीन नंदनवन, नागपूर) येथे फेरमतदान घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तिथे सोमवारी ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ ते संध्याकाळी ४ या वेळेत फेरमतदान घेतले जाईल. यावेळी मतदारांच्या उजव्या हाताच्या अनामिकेवर (Ring Finger) पक्की शाई लावली जाईल, असे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी कळविले आहे. मतदान केंद्र क्रमांक २५ येथे ३ फेब्रुवारीच्या मतदानाच्या दिवशी योग्य मतदान प्रक्रियेचा अवलंब केला गेला नसल्याने फेरमतदान घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. फेरमतदान होणार असल्यामुळे नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाची मतमोजणी मंगळवारी ७ फेब्रुवारी रोजी होणार आहे.