फरहानसोबत लिव्ह-इनमध्ये रहात असल्याच्या निव्वळ अफवा

43

मुंबई – बॉलीवूडमध्ये सध्या श्रद्धा कपूरला फरहान अख्तरच्या घरातून तिचे वडील शक्ती कपूर यांनी फरफटत आपल्या घरी परत नेल्याची चर्चा जोरात सुरू आहे. मात्र ही ही खोटी कहाणी रचण्यात आली असून यात अजिबात तथ्य नसल्याचं श्रद्धा कपूरने सांगितलंय.

श्रद्धाने एका इंग्रजी वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितलंय की “मला कोणीतरी मेसेज करूनया अफवेबाबत सांगितलं. जेव्हा मला हे कळालं तेव्हा मला आश्चर्याची धक्काच बसला. आम्ही पण माणसं आहोत हे अनेकांना कळत नाही” असं श्रद्धाने म्हटलंय. आम्ही कलाकार असल्याने आमच्याबद्दल काहीतरी खमंग चर्चा करायला मिळावी असं काहींना वाटत असतं त्यामुळेच या अफवा उठवल्या जातात असं श्रद्धाने म्हटलंय.

श्रद्धाला या मुलाखतीमध्ये फरहानबरोबर तिचं नाव जोडलं जात असल्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर ती म्हणाली की या आधी माझं नाही आदित्य रॉय कपूर बरोबर देखील जोडण्यात आलं होतं. अशा पद्धतीने अनेकांची नावे अनेकांबरोबर जोडली जातात मात्र अशा प्रकरणांमध्ये घरच्यांची नावं घुसडली जातात तेव्हा मग ते काही बरोबर नसतं असं श्रद्धाने म्हटलंय.

श्रद्धा म्हणाली की मी माझ्या घरामध्ये खूष आहे, आणि मीच नवऱ्याला आमच्या घरात आणेन असं माझ्या घरचे नेहमी गमतीनं म्हणतात असं श्रद्धाने मिश्कीलपणे सांगितलं. माझं स्वत:चं घर असून तिथे माझ्या मिटींग होत असतातआणि माझं अतिरिक्त सामान मी त्या घरात ठेवते,त्यामुळे सध्याचं घर सोडून माझ्या दुसऱ्या घरात जाण्याचाही माझा विचार नाही असं श्रद्धाने सांगितलंय.

आपली प्रतिक्रिया द्या