कपिल शर्माचा भाव घसरला,सुनील ग्रोव्हर तेजीत

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवर यांच्यात झालेल्या वादावर तोडगा निघण्याची सर्व शक्यता बंद होताना दिसत आहे. सुनील ग्रोवर आणि अन्य कलाकारांनी कपिलच्या कॉमेडी शोमधूनल बाहेर पडत स्वतंत्र काम सुरू केल्याने कपिलच्या ‘द कपिल शर्मा शो’चा टीआरपी घसरत आहे. टीआरपीतील घसरणीचा फटका कपिलच्या मिळकतीवर झाला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कपिल शर्माचा शो सोडल्यानंतर सुनील ग्रोवरला अनेक चांगले प्रस्ताव मिळत आहेत. सुनीलने टीव्ही शो करण्यापेक्षा स्टेज शो आणि शोमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून जाण्याकडे लक्ष वळवले आहे. तसेच एका शोसाठी भरभक्कम पैसे घेणाऱ्या कपिल शर्माने आपल्या फीमध्ये कपात केली आहे, तर सुनील ग्रोवरने आपली फी दुप्पट केली आहे. सुनील ग्रोवर आधी एका एपिसोडसाठी ७-८ लाख रुपये घेत होता, मात्र आता १३-१४ लाख रुपये घेत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या