प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहणावेळी काँग्रेस नेत्यांची हाणामारी, व्हिडीओ व्हायरल

512

प्रजासत्ताक दिनानिमित्त रविवारी देशभरात उत्साहाचं वातावरण होतं. मात्र, मध्य प्रदेशात ध्वजारोहणाच्या प्रसंगी दोन काँग्रेस नेत्यांमध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली आहे.

या घटनेचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे. देवेंद्र सिंह यादव आणि चंदु कुंजीर अशी या नेत्यांची नावं आहेत. इंदूर येथील काँग्रेस पक्ष कार्यालयात ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी या दोघांमध्ये वाद झाला आणि त्याचं पर्यवसान हाणामारीत झालं.

सुदैवाने पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला आणि पुढील घटना टळल्या. या घटनेचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे. ध्वजारोहणावेळी अशी वर्तणूक केल्याने नेटकरी टीका करत आहेत.

पाहा व्हिडीओ-

आपली प्रतिक्रिया द्या