साहित्य विशेष- साहित्यप्रेमी भगिनी  मंडळाचे संशोधनकार्य

>> मेघना साने

साहित्यप्रेमी भगिनी मंडळ एकामागे एक मोठे प्रकल्प राबवत आहे. मराठी साहित्याच्या संशोधकांसाठी व अभ्यासकांसाठी त्यांनी अतिशय महत्त्वाचे ग्रंथ निर्माण केले आहेत. गेली सुमारे चाळीस वर्षे डॉ. मंदा खांडगे आणि त्यांच्या सहकारी संशोधक महिलांचे संशोधन कार्य सातत्याने सुरू आहे. आता 2024 साली साहित्यप्रेमी भगिनी मंडळातर्फे ‘स्त्राrसाहित्याचा मागोवा – 2011 ते 2020’ या पाचव्या खंडाचे काम चालू आहे.

हित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या संशोधन विभागाच्या महिलांच्या लक्षात आले की आपण हा जो प्रकल्प केला त्यात भारतातील विविध भाषांतील स्त्राrसाहित्यिकांची नोंद असली तरी प्रकल्प मात्र मराठी भाषेतच लिहिलेला आहे. भारतीय भाषेतील लेखिकांची माहिती संपूर्ण भारताला आणि विदेशातील लोकांनासुद्धा मिळावी या हेतूने या ग्रंथांचे इंग्रजी भाषांतर करून घेतले. फर्ग्युसन

कॉलेजमध्ये डॉ. शुभांगी रायकर या ‘भाषांचा तौलनिक अभ्यास’ या विषयाच्या तज्ञ व डॉ. शुभांगी रायकर यांनी या इंग्रजी ग्रंथांच्या संपादनाची जबाबदारी घेतली. हा भाषांतरित ग्रंथ 2009 मध्ये पूर्ण झाला. या प्रकल्पाला भारतीय विद्यापीठ पुणे यांनी आर्थिक सहकार्य दिले. ‘ज्ञानपीठ’ पुरस्कारप्राप्त साहित्यिक महाश्वेता देवी या प्रकाशन समारंभात प्रमुख अतिथी होत्या. त्यांच्यासमवेत व्यासपीठावर प्रतिभा राय, धीरूबेन पटेल, व्होल्गा आणि ज्योत्स्ना देवधर प्रभृतींच्या उपस्थितीचा लाभ झाला.

?‘स्त्राr साहित्याचा मागोवा – 2001 ते 2010’ या प्रकल्पाचा चौथा खंड 2015 साली प्रकाशित झाला. या खंडासाठी प्रकल्प प्रमुख डॉ. मंदा खांडगे यांच्याबरोबर डॉ. नीलिमा गुंडी, डॉ. ज्योत्स्ना आफळे याही संपादक मंडळात होत्या. या प्रकल्पामुळे 1850 पासून ते 2010 सालापर्यंतच्या अनेक लेखिकांना साहित्याच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे आणि स्त्राrसाहित्याच्या अभ्यासाचा पाया घालण्याचे कार्य झाले.

वरील प्रकल्पासाठी काम करताना निरनिराळ्या प्रांतातील अभ्यासकांशी संपादक मंडळातील स्त्रियांना संवाद करावा लागला. समाजसुधारणेची मुहूर्तमेढ बंगालमध्ये राजा राममोहन रॉय यांनी रोवली. महाराष्ट्रात जसे फुले पती-पत्नींनी पुढाकार घेऊन स्त्रियांचे शिक्षण सुरू केले तसेच कर्नाटक सीमेवर सावंत अप्पा पतीöपत्नी यांनीही मुलींसाठी शाळा काढल्या. बडोद्यात सयाजीराव गायकवाड यांनीही मुलींसाठी शाळा काढल्या. कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांनी शाळा काढल्या. पुण्यात धोंडो केशव कर्वे यांनी विधवा स्त्रियांसाठी आश्रम काढला व 1916 साली महिला विद्यापीठाची स्थापना केली. फक्त राजस्थानात स्त्रियांच्या शिक्षणासाठी बनस्थळी विद्यापीठ स्थापन झाले .

स्त्रियांच्या प्रगतीत समाजसुधारकांचा आणि विचारवंतांचा वाटा आहे. समाजसुधारकांनी स्त्राrला अनिष्ट रूढीपरंपरांच्या जाचामधून मुक्त केले. सतीची चाल, बालविवाह, जरठ-कुमारी विवाहसारख्या अनिष्ट रूढी समाजात होत्या. पुढे विधवा विवाहाला संमती, स्त्राrशिक्षणाची सुरुवात, अर्थार्जन करण्याची क्षमता अशा स्त्राrच्या आयुष्यात आलेल्या सकारात्मक गोष्टींमुळे प्रगती होत गेली. महाराष्ट्रातच नव्हे, तर भारतातील वेगवेगळ्या राज्यांतही स्त्राrची मानहानी करणाऱया अनेक रूढी प्रचलित होत्या. निपुत्रिक स्त्रियांना घराबाहेर काढणे, काळी जादू करण्याच्या संशयावरून स्त्रियांना मारझोड करणे इत्यादी गोष्टी घडत होत्या. त्यामुळे प्रत्येक राज्यातून समाजसुधारकांनी आणि विचारवंतांनी केलेल्या कामाचा परिणाम स्त्राrजीवनावर कसा झाला हेही अभ्यासकांना अभ्यासायचे होते.

डॉ. मंदा खांडगे आणि संपादक मंडळ यांनी आपल्या ओळखीतून सर्व राज्यांमध्ये संपर्क करून अनेक आव्हानांवर मात करून जिद्दीने काम केले. त्यामुळे प्रत्येक राज्यातून अभ्यासकांनी भरपूर माहिती पाठवली. मध्य प्रदेशसारखे मोठय़ा राज्यात संशोधक न मिळाल्याने काही सकारात्मक विचारांच्या मंडळींने काम पूर्ण करून दिले. विविध राज्यांतून आलेले राज्यभाषेतले लेख दुभाषकाकडून मराठीत करून घेण्याचे काम संपादक मंडळानी मोठय़ा कष्टाने करून घेतले. संपादक मंडळात डॉ. मंदा खांडगे यांच्याबरोबर डॉ. स्वाती कर्वे, डॉ. कल्याणी दिवेकर, डॉ. विद्या देवधर अशा संशोधक महिलांनी काम केले आणि शलाका माटे यांनी संपादन सहकार्य केले. अखेर साहित्यप्रेमी भगिनी मंडळाने 2022 मध्ये हाही प्रकल्प सिद्धीस नेला. या ग्रंथाला फार मोठे संदर्भमूल्य आहे.

‘भारतीय समाजसुधारक आणि विचारवंत यांचे स्त्रियांच्या विकासातील योगदान’ हा ग्रंथ साहित्यप्रेमी भगिनी मंडळानी स्वतच प्रकाशित केला. महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी या ग्रंथाला प्रस्तावना दिली. डिसेंबर 2022 मध्ये हा ग्रंथ प्रकाशित झाला. या मंडळाने आणखीही काही प्रकल्प केले. किशोरवयीन मुलांनी साहित्य वाचावे या दृष्टिकोनातून बालसाहित्याच्या अनेक पुस्तकांचे संक्षिप्तीकरण केले आणि मुलांसाठी छोटी पुस्तके उपलब्ध करून दिली. साहित्यप्रेमी भगिनी मंडळ एकामागे एक मोठे प्रकल्प राबवत आहे. मराठी साहित्याच्या संशोधकांसाठी व अभ्यासकांसाठी त्यांनी अतिशय महत्त्वाचे ग्रंथ निर्माण केले आहेत. गेली सुमारे चाळीस वर्षे डॉ. मंदा खांडगे आणि त्यांच्या सहकारी संशोधक महिलांचे संशोधन कार्य सातत्याने सुरू आहे. आता 2024 साली साहित्यप्रेमी भगिनी मंडळातर्फे ‘स्त्राrसाहित्याचा मागोवा – 2011 ते 2020’ या पाचव्या खंडाचे काम चालू आहे.