मंगळावर परग्रहवासीयांचं मुख्यालय होतं ?

73

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

मंगळाबाबतचं संशोधन करणाऱ्या संशोधकांना या ग्रहाच्या पृष्ठभागावर एक त्रिकोणी आकार आढळून आला आहे. हा आकार परग्रहवासीयांच्या अपघातग्रस्त यानाचा असावा असा अंदाज या संशोधकांनी बांधला आहे. या संशोधक गटाचं नाव सेक्युअर टीम १० असं असून त्यांच्या युट्यूब चॅनेलवर त्यांनी याबाबतचा एक व्हिडिओ अपलोड केला आहे. या व्हिडिओमध्ये मंगळावरील विशाल विवरांमध्ये एक त्रिकोणी वस्तू बघायला मिळतेय. ही वस्तू म्हणजे परग्रहवासीयांचे यान असावे असा त्यांनी अंदाज बांधला आहे.

या व्हिडिओमध्ये या संशोधकांनी दावा केला आहे की मंगळ,चंद्र तसेच इतर ग्रहांवर घुमटाकार आकारही बघायला मिळाले आहेत.  हे आकार म्हणजे परग्रहवासीयांचे त्या ग्रहावरचे मुख्यालय असावे असा अंदाज या संशोधकांनी बांधला आहे. काळाच्.या ओघात ही मुख्यालयं नष्ट झाली असावीत असाही तर्क त्यांनी लढवला आहे. त्यांचं हे संशोधन फोटोंच्या आधारे करण्यात आलं असून वस्तुस्थिती काय आहे हे पाहण्यासाठी मंगळावर जेव्हा मानव पोहोचेल तेव्हाच याबाबतचं सखोल संशोधन आणि खरी परिस्थिती समोर येऊ शकेल.

आपली प्रतिक्रिया द्या