अमेरिकेत सापडले १०९०० वर्षांपूर्वीचे बटाटे

36

सामना ऑनलाईन । वाशिंग्टन

अमेरिकेच्या यूटा प्रांतामध्ये तब्बल १०,९०० वर्षांपूर्वीचे बटाट्याचे भरीत सापडले आहे. उकडलेले बटाटे एका दगडामध्ये कुटण्यात आले होते. दगडांच्या खाचेमध्ये बटाट्याचे जिवाश्म मिळाले आहेत. शास्त्रज्ञांच्या मते उत्तर अमेरिकेत बटाट्याची शेती सर्वात जास्त केली जात होती. उत्तर अमेरिकेतील बटाट्याचे हे सर्वात जुने जिवाश्म असल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.

शास्त्रज्ञांनी हे जिवाश्म शोधण्यासाठी जे तंत्रज्ञान वापरले आहे त्याच तंत्रज्ञानाचा वापर करून दक्षिण इटलीमध्ये ३२,६०० वर्षांपूर्वीच्या ओट्सचा शोध लागला होता. इस्रायलमध्येही याच तंत्रज्ञानाचा वापर करून २३,००० वर्षांपूर्वीच्या गव्हाचा शोध लावण्यात आला होता. तसेच चीनमध्येही १९,५०० वर्षांपूर्वीचे बीन्स आणि २३,००० वर्षांपूर्वीच्या कंदमुळांचा शोध लागला होता. आता यूटामध्ये ऐतिहासिक काळातील बटाट्याच्या भरताचा शोध लागला आहे. ज्या भागात हे जिवाश्म सापडले आहेत त्याला पूर्वी बटाट्याचे खोरे या नावाने ओळखले जायचे.

आपली प्रतिक्रिया द्या