व्याजदर जैसे थे! रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणात बदल नाही

रिझर्व्ह बँकेने बुधवारी आपले पतधोरण जाहीर केले. व्याजदरात कोणताही बदल करण्यात येणार नसून, रेपो दरही कायम ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे कर्जदारांचा हप्ता वाढलेला नाही.

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दोन दिवसांच्या बैठकीनंतर बुधवारी पतधोरण जाहीर केले. कोरोनाची दुसरी लाट आलेली असली तरी अर्थव्यवस्था सावरत असल्याचे ते म्हणाले. रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे थोडी अनिश्चितता आहे, परंतु त्यामुळे अर्थव्यवस्थेच्या सुधारणेवर काहीही परिणाम होणार नाही असा दावा त्यांनी केला. रेपो दर 4 टक्के कायम ठेवण्याचा निर्णय पतधोरण समितीने घेतला. रिव्हर्स रेपो दरही 3.35 टक्के एवढाच राहणार आहे. कोरोनामुळे अर्थव्यवस्था दोलायमान असली तरी 2021-22 मध्ये जीडीपी 10.5 टक्के राहणार असल्याचा अंदाज या पतधोरणात व्यक्त करण्यात आला आहे. नव्या पतधोरणात हप्ता कमी होईल अशी आशा कर्जदारांना होती. मात्र त्यांच्या पदरी आज निराशाच आली.

आपली प्रतिक्रिया द्या