ATM संबंधित ‘या’ नियमांमध्ये होणार बद्दल, शॉपिंगसाठी बँक जारी करणार नवीन कार्ड

1210

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने चलनविषयक धोरण बैठकीनंतर काही महत्वपूर्ण निर्णय जाहीर केले आहेत. यावेळी आरबीआयने रेपो दरात कपात केली नसली तरी सामान्य नागरिकांशी संबंधित अनेक मोठे निर्णय या बैठकीत घेण्यात आले आहेत. एटीएम मशीनसंदर्भात नवीन मार्गदर्शक सूचना आणून खास प्रकारचे कार्ड सुरू करण्याचे संकेत आरबीआयकडून देण्यात आले आहेत.

आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, एटीएम सेवा प्रदात्यांसाठी लवकरच एक नवीन मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केली जाईल. एटीएम सेवांमधील फसवणूक थांबविण्यासाठी आरबीआयने हा निर्णय घेतला आहे. आरबीआयने आता खरेदीसाठी नवीन कार्ड – यासह प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट (पीपीआय) सेवा सुरू करण्याची घोषणा केली. याचा वापर 10 हजार रुपयांपर्यंतच्या वस्तू आणि सेवा खरेदी करण्यासाठी केला जाऊ शकतो.

आरबीआयच्या म्हणण्यानुसार. हे कार्ड बँक खात्यातून रिचार्ज केले जाऊ शकते. या कार्डचा बिल भरणा आणि इतर प्रकारच्या खरेदीसाठी वापरले जाऊ शकते. याशिवाय बँकेत रोख रक्कम जमा करून पीपीआय कार्ड रिचार्ज केले जाऊ शकते. तसेच डेबिट किंवा क्रेडिट कार्डच्या मदतीने रिचार्ज करण्याचा पर्याय देखील यामध्ये उपलब्ध असणार आहे. या कार्डचा वापरकरण्यासाठी कार्डधारकांना एक महिन्यात 50 हजार रुपयांपर्यंत रिचार्ज करता येईल. दरम्यान, आरबीआय 31 डिसेंबर 2019 पर्यंत यासंदर्भात अधिक माहिती जाहीर करू शकते.

आपली प्रतिक्रिया द्या