देशाच्या अर्थव्यवस्थेला दुसऱ्या तिमाहीत तरतरी, रिझर्व्ह बँकेने दिले शुभसंकेत

कोरोनामुळे ढेपाळलेल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला दुसऱया तिमाहीत तरतरी येईल, विकास दरात (जीडीपी) सकारात्मक सुधारणा होईल, असा विश्वास रिझर्व्ह बँकेने व्यक्त केला आहे. बँकेने याआधी दुसऱया तिमाहीत जीडीपीमध्ये 9.5 टक्के घट होईल, असा अंदाज वर्तवला होता. त्यात दोन टक्क्यांची सुधारणा करून आता 7.5 टक्के घसरणीचे भाकित केले आहे. गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी आर्थिक धोरण समितीच्या बैठकीत घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांची शुक्रवारी घोषणा केली. त्यानंतर त्यांनी 2020-21 या चालू आर्थिक वर्षातील जीडीपीबाबत नवीन अंदाज वर्तवला. दुसऱया तिमाहीत विकास दर निगेटिव्हवरून पॉझिटिव्हकडे वाटचाल करेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

आपली प्रतिक्रिया द्या