अद्भूत! माय -लेकी बनल्या एकाच विमानाच्या पायलट, फोटो तुफान व्हायरल

60

सामना ऑनलाईन। न्यूयॉर्क

लॉस एजेंलिसमधील आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटलांटासाठी उड्डाण केलेल्या विमानातील प्रवाशांना जेव्हा विमानाच्या पायलट दोन महिला आहेत हे कळालं तेव्हा त्यांना धक्काच बसला. कारण पुरुष पायलटच सुरक्षितरित्या विमानोड्डाण करू शकतात असे बऱ्याच प्रवाशांना वाटत होते. पण जेव्हा क्रू मेंबर्सने दोन्ही पायलट या माय लेकी असून आई ज्येष्ठ पायलट आई असून मुलगी सेकंड पायलट असल्याचे प्रवाशांना सांगितले तेव्हा मात्र सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

 

flight-4 यातील आई असलेल्या पायलटच नाव वेंडी रेक्सन असून केली रेक्सन तिच्या मुलीचे नाव आहे.

flight-2

त्यानंतर या दोन्ही माय लेकींचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जगभरात त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. विशेष म्हणजे वेंडी यांची दुसरी मुलगीही पायलट असून संपूर्ण कुटुंबच या क्षेत्रात काम करत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या