प्रबोधन कुर्ला आयोजित निबंध स्पर्धेत शिरगावकर, सरांदे प्रथम

प्रबोधन कुर्ला गणेशोत्सवानिमित्त आयोजित निबंध स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रबोधन कुर्ला गणेशोत्सव मंडळ, पल्लवी फाऊंडेशन व प्रबोधन कुर्ला पूर्व शाळा यांच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त वाचन संस्कृती जोपासण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

राज्यातून सोलापूर, पुणे, कोकण, ठाणे येथून निबंध पाठविण्यात आले होते. निबंध स्पर्धेचे विषय मराठी वाचन, मातृभाषेचे महत्त्व सांगणारे होते. सदर स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमास राज्याच्या माजी भाषा संचालिका मंजुषा कुलकर्णी उपस्थित होत्या. स्पर्धेतील उत्कृष्ट शंभर विद्यार्थ्यांच्या निबंधांना प्रमाणपत्र व शैक्षणिक साहित्य बक्षीस स्वरूपात देण्यात आले. या स्पर्धेला पालक व शिक्षक यांचाही चांगला प्रतिसाद मिळाला.

निबंध स्पर्धेचे आयोजन प्रबोधन कुर्ला संस्थेचे अध्यक्ष भाऊ कोरगावकर, विश्वस्त शलाका कोरगावकर यांच्या संकल्पनेतून करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे सदस्य व प्रबोधन कुर्ला गणेशोत्सव मंडळाचे व्यवस्थापक नीलेश कोरगावकर, आवाज तज्ञ श्रीनिवास नार्वेकर, संगीतोपचार तज्ञ मारुती साळुंखे, मुख्याध्यापिका विशाखा परब, शुभांगी मेमाणे, संतोष चिकणे उपस्थित होते.

निबंध स्पर्धेतील विजेते

(पालक गट)

  • विभावरी शिरगावकर – प्रथम
  • दीपा हिर्डेकर – द्वितीय
  • आरती धामणस्कर – तृतीय
  • आरती तारू – उत्तेजनार्थ
  • चैताली कदम – उत्तेजनार्थ

(शिक्षक गट)

  • सुरेश सरांदे – प्रथम
  • प्रीतम फिसरेकर – द्वितीय
  • अविराज बोरिवले – तृतीय
  • जयेश जाधव– उत्तेजनार्थ
  • विलास  पळसमकर – उत्तेजनार्थ