पाहा व्हिडिओ- आम आदमीवरील केजरीवालांची हुकूमशाही लघुपटातून उघड

25
arvind-kejriwal

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर आधारीत एक लघुपट काढण्यात आला आहे. ‘इनसिग्निफिकंट मॅन’ असं या लघुपटाचे नाव असून यातील एक क्लिप बाहेर आली आहे. या लघुपटामध्ये आपच्या स्थापनेनंतर दिल्लीतील सत्तास्थानी विराजमान होण्यापर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला आहे. डिसेंबर २०१२ ते डिसेंबर २०१३ दरम्यानचा काळ या लघुपटात दाखवण्यात आला आहे.

लोकशाही मूल्यांची जपणूक करणारा, सामान्य माणसासाठी लढणारा असं सांगत अरविंद केजरीवालांचा पक्ष दिल्लीमध्ये सत्तेत आला. मात्र ही सगळी बोलाची कढी असल्याचं सिद्ध करणारा एक व्हिडिओ प्रसिद्ध झाला आहे. इंडीयन एक्सप्रेस या वृत्तपत्राने लघुपटातील एक भाग प्रसिद्ध केला आहे. लघुपटाचा हा तुकड्यामध्ये आपच्या तिकीटवाटपापूर्वीच्या एका मिटींगचा भाग दाखवण्यात आला आहे. अरविंद केजरीवाल यांच्यासमोर त्यांच्यापक्षाचे कार्यकर्ते बसलेले असून ते तिकीट त्याच उमेदवाराला देण्यात यावं जो लोकांना पसंत असेल अशी मागणी करतायत. मात्र केजरीवाल यावर संतापतात आणि म्हणतात की जर मला तो उमेदवार आवडत नसेल तर मी त्याच्या प्रचाराला न जाण्याचं स्वातंत्र्य मला आहे ना ? यावर कार्यकर्त्यांनी केजरीवाल यांना थांबवत तुम्हीच म्हणाला होतात की कार्यकर्ता हा सर्वश्रेष्ठ असेल. यावर केजरीवाल आणखीनच भडकतात आणि जो तिकीटासाठी आला असेल त्याने पक्षातून चालतं व्हावं असा इशारा देतात. तुम्हीही पाहा कसा घडलाय हा संवाद

आपली प्रतिक्रिया द्या