नाताळ आणि नववर्षानिमित्त राज्य उत्पादन शुल्क विभाग सतर्क

309

नाताळ व नवीन वर्षानिमित्त जिल्ह्यात मोठया प्रमाणात अनेक कार्यक्रम होत असल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त प्राजक्ता लवंगारे, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे विभागीय उपआयुक्त प्रसाद सुर्वे यांच्या आदेशानुसार व अधीक्षक पराग नवलकर तसेच उपअधीक्षक सी.पी.निकम यांच्या नेतृत्वाखाली राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद्यविक्री, निर्मिती, वाहतूक यांना आळा घालण्यासाठी जिल्ह्यात 5 पथके व 2 भरारी पथके स्थापन केली आहेत.

नगर विभागाचे विशेष पथकामार्फत रात्रीची गस्त घालण्यात येणार असून त्यामध्ये जिल्ह्यातील सर्व परवानाकक्ष अनुज्ञप्त्या व ढाबे यांचे निरीक्षण करण्यात येणार आहे. नाताळ व नववर्ष स्वागतादरम्यान बऱ्याचदा माफक दरात उच्च प्रतीचे मद्य (स्कॉच) डयुटी फ्री स्कॉच या नावाने बनावट व भेसयुक्त मद्य विक्रीचे प्रकार झाले आहेत. भेसळयुक्त मद्य विक्रीतून मद्य प्राशान करणाऱ्या ग्राहकांची आर्थिक फसवणुक होते. त्याचबरोबर मद्य सेवनाने आरोग्यावर परिणाम होतो. तसेच अनुज्ञप्ती धारकांनी सर्व नियमांचे पालन करुन ग्राहकांना मद्य पिण्याच्या परवान्यावर मद्य विक्री करावी. अनुज्ञप्तीधारकांनी नियमांचे उल्लंघन केल्यास कठारे कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी सांगितले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या