288 विधानसभा मतदारसंघांचा आढावा, शिवसेनेच्या संपर्कप्रमुखांची महत्त्वाची बैठक

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेल्या प्रचंड यशामुळे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये सत्ताधारी मिंधे सरकारला जोरदार टक्कर देण्यासाठी शिवसेना आतापासूनच कामाला लागली आहे. पुढील चार महिन्यांतच विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार असल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी शिवसेनेच्या 288 विधानसभा संपर्क प्रमुखांची महत्त्वपूर्ण बैठक घेऊन विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आदेश दिले.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना भवन येथे झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी विधानसभा संपर्कप्रमुखांना मार्गदर्शन केले. राज्यात महाविकास आघाडीसाठी अनुकूल वातावरण असले तरी अतिआत्मविश्वास बाळगून राहू नका, असा सल्ला उद्धव ठाकरे यांनी शिवसेना विधानसभा प्रमुखांना दिला. पुढील चार महिन्यांत विधानसभा निवडणूक लागण्याची शक्यता आहे. मात्र आतापासूनच प्रत्येक किधानसभा मतदारसंघाचा आढाका घेऊन नियोजन करा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

आठवडाभरात मतदारसंघाचा अहवाल द्या!

विधानसभा संपर्कप्रमुखांच्या बैठकीत सर्व 288 मतदारसंघांची माहिती यावेळी उद्धव ठाकरे यांनी घेतली. आगामी निवडणुकीसाठी नियोजनाच्या दृष्टीने आठकडाभरात या सर्क किधानसभा संपर्कप्रमुखांनी आपापल्या किधानसभेतील अहकाल सादर करण्याच्या सूचनाही उद्धक ठाकरे यांनी यावेळी दिल्या. यामध्ये किधानसभानिहाय पक्षाची ताकद, संघटनात्मक बांधणी, लोकसभेच्या निकालात किधानसभेमध्ये मिळालेला मताधिक्य या सगळय़ांचा अहकाल किधानसभा संपर्कप्रमुख यांना आठकडाभरात सादर करावा लागणार आहे.

शिवसेनेची ताकद विरोधकांना दाखवून द्या!

राज्यात शिवसेनेची ताकद असलेल्या मतदारसंघात शिवसेना निवडणूक लढेल, असे यावेळी उद्धव ठाकरे यांनी सांगितले. निवडणूक महाविकास आघाडी म्हणून जरी लढवली गेली तरी सर्वाधिक यश मिळवण्यासाठी सर्व जागांसाठी तयारी करण्याच्या सूचनाही यावेळी त्यांनी दिल्या. जनतेच्या प्रश्नांसाठी आक्रमक होणारी शिकसेना विरोधकांना पुन्हा एकदा दाखवून द्या, असे आवाहनही त्यांनी केले.