मसालेदार लोकनाट्य

351

क्षितीज झारापकर

‘मला एक चानस् हवा’ प्रेक्षकांना हसवण्याबरोबर प्रबोधन करणारी कला म्हणजे लोकनाटय़. या कलाकृतीत हास्य, नृत्य, प्रबोधन सारे ठासून भरले आहे.

लोककला म्हणजे लोकांमधून निपजलेली कला हा एक विचार आहे. त्याचप्रमाणे लोकनाटय़ म्हणजे लोकांचं नाटय़. लोकांमधल्या प्रश्नांवर भाष्य करणारं, त्यांच्याच रोजच्या जीवनातील काही मुद्दे मांडून काहीतरी सांगण्याचा, शिकवण्याचा प्रयत्न करणारं आणि त्याच बरोबरीनं त्यांचं मनोरंजन करणारं नाटक. लोकनाटय़ हा मराठी नाटय़सृष्टीचा सर्वात यशस्वी प्रकार आहे यात वादच नाही. हरिभाऊ वडगावकर-दादु इंदुरीकर यांचं गाढवाचं लग्न, व्यंकटेश माडगुळकर-नीळू फुले यांचं कथा अकलेच्या कांद्याची आणि वसंत सबनीस- दादा कोंडके यांचं एव्हरग्रीन विच्छा माझी पूरी करा ही लोकनाटय़ं आजतागायत मराठी रसिकांना भुरळ घालताहेत. महाराष्ट्राच्या स्थापनेच्या लढय़ात लिलाधर हेगडे-वसंत बापट यांच्या सेवादलाच्या लोकनाटय़ांचा मोठा वाटा आहे जो विसरता येणार नाही. समाजप्रबोधनाचं एक अत्यंत उत्तम माध्यम म्हणून लोकनाटय़ाने आपलं अस्तित्व सिद्ध केलेलं आहे. लोकनाटय़ हे मुक्तनाटय़ आहे. या नाटकाला स्थल, काल, पात्र, नेपथ्य कसल्याच मर्यादा नाहीत. रंगमंचावरची एक गिरकी स्थल, काल आणि मुख्यतः प्रेक्षकांचा दृष्टिकोन संपूर्णतः बदलून टाकायला समर्थ असते. इतकं ताकदवान माध्यम अलिकडे रंगभूमीकडून थोडं दुर्लक्षित होऊ लागलेलं आहे. भरदार नेपथ्य अणि क्लिष्ट विषयांच्या शास्त्र्ााsक्त मांडणीत कुठेतरी मातीतलं लोकनाटय़ हरवून गेलंय.

लोकनाटय़ खरंतर बऱयाच गोष्टांrचं जनक आहे. सध्या सोशलमिडियावर फावलेल्या स्टॅन्डअप कॉमेडीची सुरुवात लोकनाटय़ातल्या बतावणीत आहे हे चटकन लक्षात येत नाही. स्टॅन्डअप कॉमेडीमध्ये सादरकर्ते रोजच्या बोलीभाषेतून सभोवतालच्या राजकीय, सामाजिक आणि एकूणच परिस्थितीवर खमंग प्रहार करतात. लोकनाटय़ातल्या बतावणीत नेमकं हेच साधलं जात होतं आणि तेही अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून. लोकनाटय़ाच्या लोकप्रियतेचं हे प्रमुख कारण होतं. आता स्टॅन्डअप कॉमेडीची भाषा ही पाश्चात्यांचं अनुकरण करत आंग्लाळलेली शहरी मराठी आहे तिथेच लोकनाटय़ाची भाषा ही समग्र महाराष्ट्राला रुचणारी रांगडी ग्रामीण आहे. हे सगळं सांभाळत अनिल ठोसर या निर्मात्याने एक नवीन भन्नाट लोकनाटय़ रंगभूमीवर आणलंय मला एक चानस् हवा. मराठी बोलणाऱया प्रदेशातल्या राजा आणि प्रजेची ही कहाणी. राजाच्या हवालदाराचं लोकनृत्य करणाऱया कलावंतीणीवर प्रेम आहे, पण राजाचं स्ंिाहासन आणा मगच लगीन ही तिची अट आहे. ही अट पुरवताना हवालदार कसा हवालदिल होतो याची गम्मत दाखवत स्ंिाहासन म्हणजे नेमकं मंजूळेला काय हवंय हे सांगणारं लोकनाटय़ म्हणजे ंमला एक चानस् हवा. खरं तर लोकनाटय़ खुलतं ते त्यातील सोंगाडय़ा आणि सूत्रधारामुळे. पण ंमला एक चानस् हवा खुलण्यात खूप महत्त्वाचा वाटा दिग्दर्शक संजय कसबेकर यांचा आहे. स्वतः उत्तम नट असल्याने कसबेकरांनी ंमला एक चानस् हवा हे सुलभ शैलीत चपखल उभं केलेलं आहे. प्रत्येक पंचचं टायमिंग आणि नाटकाची एकंदर गती कसबेकरांनी कमालीची साधलेली आहे. स्मूथ रचलेलं नाटक अलीकडच्या काळात पाहण्यात आलेलं नाही.

हवालदार, शिपाई, राजा अणि मंजूळा ही पात्रं मला एक चानस् हवाचा डोलारा आपल्या खांद्यावर लिलया पेलतात. हे कसब राजेश कोळंबकर या लेखकाचं. लोकनाटय़ लिहिताना मुळात आपण नाटक लिहीत आहोत हे भान कोळंबेकरांनी कुठेही ढासळू दिलेलं नाही. त्यांनी उत्तम लिहिलेल्या नाटकाला उदंड न्याय ंमला एक चानस् हवां या नाटकाच्या कलाकारांनी दिलेला आहे. शिपाई झालेला सचिन माधव हा गेल्या वर्षीचा झी चा परितोषिक विजेता कलाकार आहे. बाजिराव मस्तानी या ठोसर यांच्याच आधीच्या लोकनाटय़ासाठी त्याला हा बहुमान मिळालेला आहे. हवालदाराच्या मध्यवर्ती भूमिकेत रमेश वाणी गुणवंत अणि हरहुन्नरी अभिनेता आहे. रमेश हा प्रायोगिक, हौशी आणि व्यावसयिक रंगभूमीवरचा प्रदीर्घ अनुभव असलेला कसलेला नट आहे. हवालदार साकारताना त्याचा हा अनुभव आपल्याला ठायी ठायी जाणवतो. सहकलाकारांना जागा देत सगळ्यांना सामावून घेत रमेश ंमला एक चानस् हवां फुलवते हे वाखाण्याजोगं आहे. राजा झालेला अनिल शिंदे केवळ देहबोलीतून प्रेक्षकांना काबिज करतो. अनिलचा रंगमंचावरचा वावर केवऴ कमाल आहे. मंजुळा साकारणारी तेजस्वी परब ही लक्षणीय अभिनय करून जाते. कॉमेडीचं टायमिंग साधणारी अभिनेत्री दुर्लभ असते. तेजस्वी केवळ स्वतःच्या पंचचं टायमिंग सांभाळत नाही तर इतर सहकलाकारांचे पंचेसही सांभाळत पात्र उभं करते हे कौतुकास्पद आहे. राजू नाक्ती, सचिन वळंजू, अनूप जाधव अणि सहनर्तिका अमिता व अमृता हे सर्वजण ंमला एक चानस् हवां खूपच मजेशीर करतात. अनूप जाधवचा नेता तर अतिशय मजेदार झालेला आहे.

लोकनाटय़ म्हटलं की, त्यात लावणी हा नृत्यप्रकार असायलाच हवा. ंमला एक चानस् हवा मध्येही तो आहे. गेल्या काही वर्षांत जी लोकनाटय़ आली त्यांच्यात आधीच लोकप्रिय झालेली गाणी घेतलेली गेली. ंमला एक चानस् हवासाठी संगीतकार अमीर हडकर हे गीतकार झाले आणि त्यांनी तब्बल पाच नवीन गाणी नाटकात दिलेली आहेत. अमीरचं संगीत अतिउत्कृष्ट या सदरातच मोडणारं झालेलं आहे. मला एक चानस् हवा हे नाटक या सगळ्यामुळे एक खूप कलरफूल अणि मनोरंजक अनुभव झालेला आहे. अनिल ठोसर, संजय कसबेकर, राजेश कोळंबकर ही मंडळी खूप वर्षं मराठी नाटय़सृष्टीत कार्यरत आहेत. आपला एकंदरीत अनुभव गाठीशी घेऊन त्यांनी हे एक अत्यंत सुंदर असं लोकनाटय़ आपल्यासमोर ठेवलंय. आता नाटय़प्रेमी म्हणून ते अनूभवणं हे आपलं कर्तव्य आहे. ंमला एक चानस् हवां मध्ये पूरक कन्टेन्ट आहे, भावणारा विनोद आहे, क्वचित चावटपणा आहे आणि भरघोस मनोरंजन आहे. थोडक्यात ंमला एक चानस् हवां सर्वगुणसंपन्न आहे.

नाटक – मला एक चानस् हवा
निर्मिती – ऋणानुबंध कला आविष्कार
निर्माते – अनिल ठोसर, चारूशीला ठोसर
लेखक – राजेश कोळंबकर
संगीत, गीतकार – अमीर हडकर
नेपथ्य – अजय पुजारी, प्रवीण गवळी
नृत्य दिग्दर्शक – संतोष भांगरे
रंगभूषा – अनंत मोरे
दिग्दर्शक – संजय कसबेकर
कलाकार – तेजस्वी परब, अमिता, अमृता, अनिल शिंदे, रमेश वाणी, सचिन माधव
दर्जा – तीन स्टार

आपली प्रतिक्रिया द्या