मी व सुशांत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होतो – रिया चक्रवर्ती

2900

अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्येनंतर त्याची गर्लफ्रेंड व अभिनेत्री रिया चक्रवर्ती ही अडचणीत सापडली आहे. सुशांतच्या वडिलांनी रिया विरोधात बिहारमध्ये तक्रार दाखल करत तिच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणी रियाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. रियाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करत या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांनीच करावा अशी मागणी केली आहे.

सुशांत सिंग राजपूतची हत्याच, सुब्रमण्यम स्वामींचा दावा

रियाचे वकील सतीश मानेशिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात तिच्या वतीने याचिका दाखल केली आहे. या याचिकेत रियाने ती व सुशांत हे वर्षभर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते व त्यावेळी सुशांत नैराश्याशी झुंजत होता अशी माहिती दिली आहे. सुशांतच्या आत्महत्येच्या सात दिवस आधीच म्हणजे 8 जूनला रियाने सुशांतचे घर सोडले होते. त्यानंतर ती तिच्या सांताक्रुझ येथील घरी राहायला लागली होती. रियाने तिच्याविरोधात सुशांतच्या वडिलांनी केलेले आरोप खोटे असल्याचा दावा देखील केला आहे. या याचिकेत तिने या प्रकरणाचा तपास बिहार पोलिसांनी न करता मुंबई पोलिसांनीच करावा अशी मागणी केली आहे. ‘सुशांत सिंग राजपूत यांची पाटणामध्ये खूप ओळख आहे. त्यामुळे बिहार पोलीस या प्रकरणी मला योग्य तपास करतील असे वाटत नसल्याचे तिने या याचिकेत म्हटले आहे.

…तर सुशांतचा अखेरचा चित्रपट ‘दिल बेचारा’ने पहिल्याच दिवशी कमावले असते 2 हजार कोटी

सुशांतच्या वडिलांनी रियासोबतच तिचे कुटुंबीय इंद्रजीत चक्रवर्ती, संध्या चक्रवर्ती व शौविक चक्रवर्ती यांच्याविरोधात देखील गंभीर आरोप केले आहेत. ‘मे 2019 पर्यंत माझ्या मुलाच्या आयुष्यात सर्व काही व्यवस्थित सुरू होते. मात्र त्यानंतर ही रिया चक्रवर्ती नावाची तरुणी त्याच्या आयुष्यात आली व तिथून त्याची वाताहत सुरू झाली. रिया व तिच्या कुटुंबीयांनी मिळून माझ्या मुलाला लुटल आहे. तिने सुशांतने मेहनतीने कमावलेले कोट्यवधी रुपये लुटले आहेत. रिया व तिचे कुटुंबीय सुशांतच्या प्रत्येक गोष्टीत दखल द्यायचे. रिया माझ्या मुलासोबत त्याच्या घरी राहायला आली. त्यानंतर तिने त्याला या घरात भुताटकी असल्याचे सांगितले व त्याला ते घर सोडायला लावले. तो पहिला प्रघात माझ्या मुलावर झाला. तो एअरपोर्ट जवळील एका रिसॉर्टमध्ये राहू लागला. तसेच ते सतत माझ्या मुलाला सांगायचे की तो काहीतरी विचित्र बरळत असतो त्यामुळे त्याला डॉक्टरची गरज आहे. त्यावेळी माझी मुलगी सुशांतला पाटणाला घेऊन येण्यासाठी मुंबईला गेली होती. त्यावेळी देखील रियाच्या कुटुंबीयांनी आडकाठी आणत सुशांतला येऊ दिले नाही’, असे त्या एफआयआरमध्ये म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या