नेपाळचा गेंडा वाहून आला हिंदुस्थानात

36

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

नेपाळच्या चितवन नॅशनल पार्कमधील एक गेंडा पुराच्या पाण्यात वाहून हिंदुस्थानात आला आहे. तब्बल ४२ किलोमीटर इतका प्रवास करून येणाऱ्या या मादी गेंड्याला सुखरूप वाचवण्यात आलं आहे. तिला वाचवण्यासाठी तब्बल ४० अधिकारी दिवसरात्र झटत होते.

चितवन नॅशनल पार्कच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंदुस्थानी वन अधिकाऱ्यांच्या मदतीने आम्ही गेंड्याला वाचवलं. हा मादी गेंडा अडीच वर्षांचा आहे. अजूनही चार गेंडे पुराच्या पाण्यात अडकले असून एक गेंडा या पुरामुळे मृत्युमुखी पडला आहे. चितवन नॅशनल पार्कमध्ये ६०० हून अधिक गेंडे आहेत. पुरामुळे वाहून आलेला गेंडा हा अतिशय दुर्मीळ असा एक शिंगी गेंडा आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये मुसळधार पावसामुळे नेपाळ, हिंदुस्थान आणि बांग्लादेश या देशांमध्ये पुराने कहर माजवला आहे. आसाम राज्यातील प्रसिद्ध काझीरंगा राष्ट्रीय उद्यानातही मुसळधार पावसामुळे किमान सहा गेंडे मृत्युमुखी पडले असावेत, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या