श्रीमंत महिलेने बॉयफ्रेंडला बनवले घरगडी, महिन्याला देते अकरा लाख पगार

टीकटॉकवर सध्या ज्युली नावाच्या 45 वर्षीय महिलेच्या प्रेमकहाणीची चर्चा रंगली आहे. ज्युलीने तिच्या 30 वर्षीय बॉयफ्रेंडला तिच्याच घरी घरगडी म्हणून कामाला ठेवले आहे. त्यासाठी ती त्याला अकरा लाख रुपये पगार देखील देते.

‘मी महिन्याला माझ्य़ा बॉयफ्रेंडवर जवळपास पंधरा लाख खर्च करते. त्याच्यात अकरा लाख त्याचा पगारच आहे. ज्यात तो माझ्या घरातील सर्व कामं करतो. घरातील साफ सफाई, जेवण बनवणं, लादी पुसणं, भांडी घासणं असं सर्वच करतो. त्यासाठी मी त्याला बराच मोठा पगार देते. यामुळे माझा बॉयफ्रेंड पूर्णवेळ माझ्यासोबत राहतो व घरातील कामही होते. पण इतका पगार देऊनही तो अनेकदा घरातली कामं विसरतो. गेल्या आठवड्यात त्याने पूल साफ केला नाही’, असे ज्युली सांगते. द सन युकेने ही बातमी दिली होती.

सदर महिलेला तिच्या व तिच्या बॉयफ्रेंडमधील वयाच्या फरकामुळे अनेकदा ट्रोल केले जाते. ”वयातील अंतर बघून अनेकदा मला ट्रोल केले जाते. तु म्हातारी झालीस की तुझा बॉयफ्रेंड तुम्हाला सोडून जाणार. तो दुसऱ्या मुलीच्या प्रेमात पडेल. तरुण मुलगी पटवेल. असं सतत ऐकवलं जातं. पण मी त्याकडे दुर्लक्ष करते.’, असेही ज्युली सांगते.

आपली प्रतिक्रिया द्या