गुड्डू भैय्या आणि भोलीचं लग्न ठरलं, एप्रिलमध्ये बँड, बाजा, बारात

1607

हिंदी चित्रपटसृष्टीतील आणखी एक जोडपं लग्नाच्या तयारीत आहे. गेले अनेक महिने हे दोघेजण एकत्र फिरताना पाहायला मिळाले होते. या दोघांनी त्यांच्यातील गोड नाते फार काळ लपवून ठेवले नाही आणि आपण एकमेकांच्या प्रेमात असल्याची कबुली दिली. 2012 साली एका चित्रपटाच्या निमित्ताने हे दोघेजण एकत्र आले होते. 2015 साली त्यांनी एकमेकांना ‘डेट’ करायला सुरुवात केली होती. 2017 साली या दोघांनी आपण एकमेकांच्या प्रेमात असल्याची जाहीर कबुली दिली होती आणि आता हे दोघे विवाहबंधनात अडकणार असल्याची माहिती मिळाली आहे.

आम्ही ज्या जोडप्याबद्दल बोलतोय ते आहे रिचा चढ्ढा आणि अली फजल यांचं. ‘फुकरे’ चित्रपटाच्या सेटवर या दोघांची ओळख झाली होती आणि नंतर ही ओळख प्रेमात बदलली. या दोघांनी दिल्लीमध्ये लग्न करायचं ठरवलं असून हा विवाहसोहळा दोन दिवस चालणार आहे. या लग्नाला अनेक कलाकार हजेरी लावणार आहे. लग्न हटके पद्धतीने व्हावं यासाठी हे दोघेजण सध्या धावपळ करत असल्याचं कळतं आहे.

रिचा चढ्ढा नुकतीच कंगना रणौतची भूमिका असलेल्या पंगा चित्रपटात दिसली होती. रिचा चढ्ढा बी ग्रेड अभिनेत्रीच्या जीवनावर आधारीत चित्रपटात दिसणार आहे. सिल्क स्मिताच्या आयुष्यावर आलेला ‘द डर्टी पिक्चर’ हा चित्रपट प्रचंड गाजला होता. या चित्रपटासाठी अभिनेत्री विद्या बालन हिला अनेक पुरस्कारही मिळाले. सिल्क स्मितासारख्याच हॉट अदांमुळे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत शकिला नावाची अभिनेत्री बरीच गाजली होती. आता तिच्याही जीवनावर आधारीत चित्रपट काढण्यात येत आहे.

शकिला या दक्षिणेकडील अॅडल्ट स्टार असलेल्या अभिनेत्रीवर चित्रपट येणार असून त्यात रिचा चढ्ढा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे सध्या चित्रीकरण सुरू आहे. इंद्रजित लंकेश हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असून अद्याप या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख निश्चित झालेली नाही. मात्र हा चित्रपट हिंदीसोबत अन्य दाक्षिणात्य भाषांमध्ये देखील डब केला जाण्याची शक्यता आहे.

शकिला यांचे आयुष्य हे लहानपणापासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकलेले होते. आपल्याला आईनेच वेश्याव्यवसायात ढकलले होते असा सनसनाटी आरोपी त्यांनी केला होता.  ‘मी १३ वर्षांची होती तेव्हाच माझे वडील वारले. मी व मला सात भावंड होती. एवढ्या लोकांचे पालन पोषण करणं माझ्या आईला एकटीला शक्य नव्हतं. त्यामुळे तिने मला वेश्याव्यवसायत ढकललं. तिथूनच माझ्या अभिनयातील प्रवासाला देखील सुरुवात झाली. वेश्याव्यवसायात असतानाच मला चित्रपटाच्या ऑफर येऊ लागल्या. लोकांना असं वाटतं की आम्ही मोठ्या पडद्यावर जसे दिसतो तसेच प्रत्यक्ष आयुष्यात असू, मात्र मी तशी नाही.  कॅमेरा समोर पडत असलेला माझा पदर कॅमेरा बंद होताच मी पिन लावून सावरते’ असे शकिला यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या