प्रसिद्ध गायक रिकी मार्टीनने गुपचूप केला समलिंगी विवाह

37

सामना ऑनलाईन । लॉस एंजलिस

एकेकाळी आपल्या गाण्यांनी जगभरातील तरूणाईला वेड लावणाऱ्या रिकी मार्टीनने समलिंगी विवाह केला आहे. गेले बरेच दिवस तो आणि ज्वान योसेफ हे एकमेकांच्या आकंठ प्रेमात होते. वर्षभर एकत्र राहिल्यानंतर या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. रिकी मार्टीनने स्वत: ई- न्यूज या वृत्तवाहिनीशी बोलताना गपचूप लग्न केल्याची माहिती दिली आहे. याच वृत्तवाहिनीने या दोघांच्या प्रेमसंबंधांबाबत सर्वात पहिल्यांदा बातमी दिली होती.

ज्वान आणि रिकी यांनी एप्रिल २०१७ मध्ये साखरपुडा केला होता. तेव्हापासून हे दोघे लग्न कधी करणार याकडे प्रसारमाध्यमांचे लक्ष लागून होते. पण या दोघांनीही कुणालाही कळू न देता गपचूप लग्न केले आहे. रिकीने स्वत: याबाबत सांगितले आहे मात्र त्याने कधी लग्न केले हे सांगितलेले नाही. ‘आमच्या नात्यात मी नवरा आहे तर ज्वान बायको. आम्ही गेली दोन वर्ष एकत्र राहतोय. लग्नासाठीची कायदेशीर प्रक्रिया आम्ही पूर्ण केली असून आम्ही अधिकृतरित्या आता विवाहबद्ध झाल्याचं रिकीने म्हटलं आहे. लग्नानंतर आता हे दोघे त्यांच्या मित्र मैत्रिणींसाठी एका जंगी पार्टीचे आयोजन करणार आहेत.

ज्वान हा सिरियातील एक चित्रकार असून त्याने प्लास्टिक आर्टसमध्ये पदवी मिळवली आहे. ज्वान आणि रिकी हे गेल्या दोन वर्षांपासून एकत्र राहत आहेत. रिकीला वॅलेण्टिनो आणि मॅटीओ ही दोन जुळी मुलं आहेत. ज्वान त्या दोघांचाही चांगल्या प्रकारे सांभाळ करतो. रिकी मार्टीनचे यापूर्वी कार्लोझ गोन्झालेझ या तरूणासोबत प्रेमसंबंध होते.

आपली प्रतिक्रिया द्या