रिधीमा पंडीत मराठी चित्रपटात!

62

सामना ऑनलाईन । मुंबई

छोट्या पडद्यावरील ‘बहू हमारी रजनीकांत’ या मालिकेमुळे लोकप्रिय झालेली मराठमोळी अभिनेत्री रिधीमा पंडीत लवकरच रूपेरी पडद्यावर नव्या इनिंगला सुरुवात करणार आहे. अभिनेता अंकुश चौधरीसोबत ती मराठी चित्रपटात झळकणार असून या चित्रपटात काम करण्यासाठी खूप उत्सुक असल्याचे ती सांगते.

रजनी-कांत या मालिकेत ग्लॅमरस बहूच्या रूपात दिसलेली रिधीमा या चित्रपटात मात्र गावात राहणाऱ्या एका साध्या मुलीची व्यक्तिरेखा साकारणार आहे. आपल्या भूमिकेसाठी तिने कोंकणी भाषेचे धडे देखील गिरवले आहेत. तिच्या भूमिकेबाबत रिधीमा म्हणाली की, ‘मराठी चित्रपटात काम करण्याची अनेक वर्षांपासूनची माझी इच्छा यानिमित्ताने पूर्ण होत आहे. चित्रपटात मी डिग्लॅमर लूकमध्ये झळकणार असून साधी वेशभूषा आणि रंगभूषेत मी पहायला मिळणार आहे.’ हिंदीच्या तुलनेत मराठी इंडस्ट्रीत काम करताना खूप मजा आली. या इंडस्ट्रीतील लोकांचा आपलेपणा भावल्याचेही ती आवर्जून सांगते.

आपली प्रतिक्रिया द्या