सिंहगड घाटरस्त्यात दरड कोसळली; सुरक्षारक्षकांच्या जागरूकतेमुळे दुर्घटना टळली

111

सामना प्रतिनिधी । खडकवासला

सिंहगड घाटरस्त्यावर या वर्षीही दरड कोसळण्यास प्रारंभ झाला असून रविवारी दुपारी मोठी दरड कोसळली. सुदैवाने वाहतूक सुरळीत करण्यासाठी घाटात उपस्थित असलेल्या सुरक्षारक्षकांच्या जागरूकतेमुळे कोणतीही दुर्घटना झाली नाही. वन समितीने दरड हटविल्याने सायंकाळपर्यंत रस्ता खुला केल्यानंतर गडावर अडकून पडलेले पर्यटक सुखरूप घरी पोहोचले.

रविवार सुट्टीचा दिवस असल्याने आज गडावर पर्यटकांची गर्दी झाली होती. त्यामुळे वन विभागाकडून टप्प्याटप्प्याने गडावर वाहने सोडण्यात येत होती. दुपारी साडेतीनच्या सुमारास घाटातील एका वळणावर कड्य़ावरून लहान लहान खडे आणि मुरूम पडत असल्याचे वन संरक्षण समितीचे विठ्ठल पढेर आणि बबन मरगळे यांनी पाहिले. त्यांनी तातडीने पायथ्याशी असलेल्या रक्षकांशी संपर्क साधून वाहने सोडू नये अशी सूचना केली. त्यानंतर खडे पडत असलेल्या ठिकाणी दोन्ही बाजूंची वाहतूक थांबवून ते ठिकाण मोकळे करण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या