महिला रातोरात झाली करोडपती.. २०० रुपयांच्या बदल्यात मिळाले ५ कोटी!

36

सामना ऑनलाईन । लंडन

कोणाचं नशिब कसं उजळेल सांगता येत नाही… इंग्लंडमधील एक महिला रातोरात करोडो रुपयांची मालक बनली आहे. ३७ वर्षापूर्वी गुंतवलेल्या २०० रुपयांच्या बदल्यात तिला आज करोडो रुपये मिळाले आहेत. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल तिने २०० रुपये नेमके कशात गुंतवले होते?.. या महिलेने ८०च्या दशकात एक अंगठी खरेदी केली होती. ती महिला त्या अंगठीला सर्वसाधारण अंगठीप्रमाणे रोज बोटात घालत होती. मात्र त्या महिलेला किंचितही कल्पना नव्हती की तिने बोटात घातलेल्या अंगठीत खरा हिरा आहे आणि त्याची किंमत करोडो रुपये आहे.

एकेदिवशी आपण घातलेल्या अंगठीतील हिरा खरा असल्याचं या महिलेला कळालं. या गोष्टीची शहानिशा करण्यासाठी तिने थेट दागिन्यांचा लिलाव करणारी संस्था गाठली. त्यावेळी या २६.२७ कॅरेटच्या हिऱ्याची बाजारभावाप्रमाणे किंमत जवळपास २ कोटी ते ३ कोटी रुपये असल्याचं तिला समजलं. मात्र हिऱ्याच्या खरेदीसाठी बोली लागली गेली त्यावेळी या हिऱ्यासाठी ५.४ कोटींची बोली लागली. हिरा दुर्मिळ असल्याने त्याला एवढ्या मोठ्या प्रमाणावर बोली लागली असल्याचं तज्ज्ञांनी स्पष्ट केलं आहे. हिरा खरा असला तरी त्याला जुन्या पद्धतीने पैलू पाडण्यात आले होते. त्यामुळे तो खरा आहे की खोटा याचा अंदाज महिलेला इतकी वर्ष आला नाही. तसेच पॉलिश केला नसल्याने हिरा जसा चमकतो तसा हा हिरा चमकतही नव्हता.

आपली प्रतिक्रिया द्या