‘रिंकिया के पापा’ फेम प्रसिद्ध भोजपुरी संगीतकार धनंजय मिश्रा यांचे निधन

1091

चित्रपट इंडस्ट्रीसाठी 2020 हे वर्ष तितकेसे चांगले जात नाहीये असेच दिसतेय. आजच बॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक बासू चॅटर्जी यांचे निधन झाले. या धक्क्यातून सावरत नाही तोच इंडस्ट्रीला आणखी एक धक्का बसला. भोजपुरी इंडस्ट्रीमधील ‘रिंकिया के पापा’ फेम प्रसिद्ध भोजपुरी संगीत दिग्दर्शक धनंजय मिश्रा यांचे निधन झाले आहे.

भोजपुरी सिनेमाचे मेगास्टार मनोज तिवारी यांच्या ‘रिंकिया के पापा’ या लोकप्रिय गाण्यासह अनेक अल्बम आणि चित्रपटांना संगीत दिलेले प्रसिध्द संगीत दिग्दर्शक धनंजय मिश्रा यंक्सचे गुरुवारी निधन झाले. धनंजय मिश्रा यांच्या निधनावर भोजपुरी इंडस्ट्रीतील कलाकारांनी शोक व्यक्त केला. भोजपुरी स्टार निरहुआ आणि खेसारी लाल यादव यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या.

भोजपुरी चित्रपट इंडस्ट्रीमधील आमच्या सर्वांच्या आवडीचे संगीतकार धनंजय मिश्रा यांच्या जाण्याने धक्का बसला आहे. धनंजय आमच्या हृदयात आठवण बनून राहील. ईश्वर त्याच्या आत्म्याला शांती देओ, असे ट्विट निरहुआ याने केले आहे.

4 जून रोजी सकाळी 7 वाजता मुंबईत धनंजय मिश्रा यांचे निधन झाले. मीरा भायंदर येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या