उत्तर प्रदेश: तुरुंगावर कब्जा करून कैद्यांची प्रचंड दगडफेक, जाळपोळ

21

फारुखाबाद

उत्तर प्रदेशचा आता ‘उत्तम’ प्रदेश होईल, असे नवे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे सांगत फिरत असतानाच आज फत्तेहगड जिल्हा कारागृहातील कैद्यांनी सुरक्षा रक्षकांना ओलीस धरून जाळपोळ, दगडफेक केली. कैद्यांचा हा हैदोस तब्बल सात तासांहून अधिक काळ चालला. त्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह संतोष कुमार हा सुरक्षा कर्मचारी जखमी झाला.

कैद्यांनी तुरुंगातील बराकी पेटवल्या आणि कारागृहाच्या छतावर चढून दगडफेक केल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली होती. कैद्यांनी चादरी, गाद्या, उशा पेटवून दिल्यामुळे बराकींमध्ये मोठीच आग भडकली. अतुल नावाच्या कैद्याला बराकीत नेत असताना त्याने सुरक्षा रक्षकाला धक्काबुक्की केली. या प्रकारामुळे तुरंगाचा ‘अलार्म’ वाजला आणि एकच गोंधळ उडाला. कैद्यांनी बराकींवर चढून दगडफेक आणि जाळपोळ केली. तुरुंगात निकृष्ट अन्न दिले जाते, पोलिसांकडून छळ होतो, अशा तक्रारी कैद्यांनी केल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या