गुजरातेत पाटण जिल्ह्यात जातीय दंगल; दोन ठार, १५ जखमी

19

२० मुस्लिमांची घरे जाळली

अहमदाबाद

गुजरातमधील पाटण जिल्हय़ात वडवाली गावात १०वीच्या परीक्षा केंद्रावर मुस्लिम आणि ठाकोर समाजाच्या दोन विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या वादातून काल जातीय दंगल भडकली. यानंतर सुरणसर रामपुरा ऐर धारपुरी गावामधील पाच हजारांहून अधिक गावकऱयांनी वडवालीमधील २० मुस्लिमांची घरे पेटवून दिली. यावेळी दंगलखोरांनी तेथील मॅटेडोरसह १५ वाहनेही पेटवून दिली. या दंगलीत दोन ठार तर १५ जण जखमी झाले आहेत.

गावावर मोठय़ा संख्येतील लोक हत्यारांसह चाल करून येत असल्याचे समजताच मुस्लिमांनी आपल्या मुलाबाळांसह शेजारच्या गावांमध्ये आश्रय घेतला. त्यामुळे ते बचावले आहेत.

या दंगलीची माहिती मिळताच पोलिसांनी वडवाली गावात धाव घेतली तेव्हा दंगलखोरांनी पोलिसांवरच दगडफेक केली. यावेळी जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला. अश्रुधुराच्या नळकांडय़ा फोडल्या. या दंगलीच्या पार्श्वभूमीवर पाटण गाव आणि आजूबाजूच्या गावांमधील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. गावात संचारबंदी केली आहे.

कशामुळे झाली दंगल?

वडवाली येथील इयत्ता दहावीच्या परीक्षा केंद्रावर शनिवारी सकाळी मुस्लिम व ठाकोर समाजाच्या विद्यार्थ्यांत वादावादी, हाणामारी झाली. यानंतर एक विद्यार्थी पळत पळत धारपुरी गावात आल्यानंतर त्याने सर्व कहाणी सांगितली. या विद्यार्थ्यांकडून सर्व ऐकल्यानंतर संतप्त गावाने शस्त्रे, हत्यारांसह वडवाली गावावर चाल केली. २० मुस्लिमांची घरे, १५ वाहने पेटवून दिली.

आपली प्रतिक्रिया द्या