खोटारडी, माझा पिच्छा सोड ताई! ऋषभ पंतने अभिनेत्री उर्वशी रौतेलाला झापलं

बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला आणि हिंदुस्थानी क्रिकेटपटू ऋषभ पंत सध्या सोशल मीडियावर ट्रेण्ड होत आहेत. याआधीही अनेकदा दोघांमध्ये काहीतरी सुरु असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मागच्या वर्षी उर्वशीने ट्विटरवर ऋषभ पंतला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. मात्र आता तिने दिलेल्या मुलाखतीमुळे ती चर्चेत आली आहे. मात्र या दरम्यान ऋषभ पंतने जे उत्तर दिले, ते प्रचंड व्हायरल होत आहे.

टीम इंडियाचे स्टार क्रिकेटपटू ऋषभ पंत आणि बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. हे पहिल्यांदाच झालेले नाही तर, दोघांची नावं एकसाथ चर्चेत आली आहेत. याआधीही दोघं अनेकदा ट्रेण्ड होत होते. आता दोघांमध्ये हे प्रकरण इतके वाढले की पंतला बोलावे लागले की, माझा पिच्छा सोड ताई! झाले असे की, ऋषभ पंत आणि उर्वशी रौतेला या दोघांचे नाव गेल्यावर्षीपासून चर्चेत आले आहे. मागच्या वर्षी उर्वशीने ट्विटर वर ऋषभ पंतला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्यावेळी तिने लिहीले की, वाढदिवसाच्या शुभेच्छा ऋषभ पंत.आताही दोघांचे नाव ट्रेण्डमध्ये आहे.

ऋषभ पंत आणि उर्वशी रौतेला कधी एकत्र दिसले नाहीत, मात्र मीडियामध्ये त्यांच्या अफेअरच्या बातम्या येऊ लागल्या होत्या. याच दरम्यान उर्वशीमे नुकतीच एक मुलाखत दिली होती, ज्यामध्ये तिने मिस्टर आरपी नाव घेतले होते. यामध्ये उर्वशीने ऋषभ पंतचे पूर्ण नाव घेतले नव्हते, मात्र चाहत्यांनी त्यांचा अर्थ ऋषभ पंत घेतला. मात्र त्यानंतर पंत ने सोशल मीडियावर पोस्ट टाकून उर्वशीला झापलं आहे. मात्र त्याने काहीवेळाने ही पोस्ट डिलीट केली. पण त्या पोस्टचा स्क्रिनशॉट सध्या व्हायरल होत आहे.

खरंतर, या मुलाखतीध्ये उर्वशीने एक किस्सा सांगितला होता की, ती वाराणसीहून दिल्लीला शुटिंग साठी आली होती, त्यावेळी मिस्टर आरपी तिला भेटायला आला होता. तो लॉबीमध्ये तिची वाट पाहत होता, मात्र ती झोपली होती. नंतर तिला कळलं की तो भेटायला आला होता. तिच्या फोनवर त्याचे 17 मिस्डकॉल होते. मात्र त्यानंतर तिने ऋषभला सांगितले की, जेव्हा तुम्ही मुंबईत याल तेव्हा भेटू आणि आम्ही भेटलोही, मात्र तोपर्यंत मीडीयामध्ये त्यांच्याबद्दल छापून आले होते. मीडीया जी गोष्ट होणार असेल ती बिघडवून टाकते असेही तिने त्या मुलाखतीत सांगितले.

उर्वशीची ही मुलाखत व्हायरल झाल्यावर ऋषभ पंतने इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली होती. मात्र काही वेळाने ही पोस्ट हटवली. मात्र त्याचा स्क्रिनशॉट सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये पंत ने लिहीलेय, हे हास्यास्पद आहे. कायम चर्चेत राहण्यासाठी आणि फेमसाठी लोकं मुलाखतीत किती खोटं बोलतात. खूप वाईट आहे की, काही लोकं नावासाठी आणि प्रसिद्धीसाठी किती भूकेलेले असतात. देव त्यांचे भले करो. पंतने पोस्टमध्ये हॅशटॅगसह लिहीले की, माझा पिच्छा सोड ताई, खोटं बोलण्याचीही हद्द असते.