पुन्हा एकदा एकत्र दिसणार अकबर आणि अँथनी

सामना ऑनलाईन । मुंबई

‘अमर अकबर अँथनी’, ‘नसीब’ आणि ‘अजूबा’ यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर आता ऋषी कपूर यांनी स्वतः अमिताभ यांच्यासोबत काम करणार असल्याची माहिती दिली आहे. त्यांनी अमिताभ यांचा फोटो ट्विट करत लिहिलं की, नेहमीच या अभिनेत्यासोबत काम करण्याचा अनुभव सुखद असतो. आगामी चित्रपटाची कथा टीमसोबत वाचण्यास सुरुवात केली आहे. बिग बींसोबत ऋषी कपूर यांनी काम करणार असल्याची माहिती दिली असली तरी त्यांनी चित्रपटाचं नाव मात्र गुलदस्त्यात ठेवलं आहे.

या दिग्गज अभिनेत्यांना एकत्र पाहायला मिळणार असल्याने त्यांच्या चाहत्यांसाठी ही नक्कीच आनंदाची बाब ठरणार आहे. अमिताभ यांच्या कामाची ऋषी यांनी नेहमीच प्रशंसा केली आहे. त्यांनी बिग बींचा उल्लेख ‘खुल्लम खुल्ला : ऋषी कपूर अनसेन्सर्ड’ या त्यांच्या आत्मचरित्रातही केला आहे. त्यात त्यांनी लिहिलं आहे की, अमिताभ हे एक प्रतिभावान अभिनेते आहेत, याबाबत अजिबात शंका नाही. त्याचसोबत ते बॉक्स ऑफिसवर राज्य करणारे नंबर वन अभिनेतादेखील आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या