ऋषी कपूर यांनी लहानपणीचा लतादीदींसोबतचा फोटो केला शेअर, झाले भावूक

2199

अभिनेते ऋषी कपूर हे नेहमी ट्विटरवर सक्रिय असतात. मागच्या वेळी त्यांनी अभिनेते प्राण यांचा एक दुर्मिळ फोटो शेअर केला होता. आता त्यांनी त्यांच्या लहाणपणीचा लतादीदींसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना ते खूप भावूक झाले आहेत.

ऋषी कपूर अवघ्या दोन तीन महिन्याचे होते. तेव्हा लतादीदींनी त्यांना आपल्या कडेवर घेतले आहे. हा फोटो शेअर करून ऋषी कपूर यांनी म्हटले आहे की, “नमस्कार लताजी तुमच्या आशिर्वादामुळे माझा एक जुना फोटो मिळाला आहे, त्यात मी अवघ्या दोन तीन महिन्याचा आहे. तुमचे आशिर्वाद नेहमीच माझ्या पाठीशी असतील. हा फोटो माझ्यासाठी अनमोल असल्याचे ऋषी कपूर यांनी म्हटले आहे.

यावर लतादीदींनीही उत्तर दिले आहे. त्या म्हणाल्या की, हा फोटो पाहून मला खूप आनंद झाला. ह फोटो मलाही सापडत नव्हता. हा फोटो पाहून कृष्णा वहीनी आणि राज कपूर यांची आठवण आली. कृष्णा वहिनीनीं तुम्हाला माझ्याकडे दिला आणि तेव्हा हा फोटो काढला गेला अशी आठवणही त्यांनी यावेळी सांगितली.

आपली प्रतिक्रिया द्या