ओळखून दाखवा ‘या’ प्रसिद्ध कलाकाराला, ऋषी कपूर यांनी दिले चॅलेंज

1891

प्रसिद्ध अभिनेते रिषी कपूर यांनी एका महिलेचा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. या फोटोतील ती व्यक्ती कोण आहे? असा प्रश्न त्यांनी नेटकऱ्यांना केला आहे. हा फोटो कोणत्या कलाकाराचा आहे ते समजल्यावर तर तुम्हाला धक्काच बसणार आहे.

ऋृषी कपूर यांनी शेअर केलेल्या महिलेचा फोटो हा कुण्या महिलेचा नसून तो प्रसिद्ध अभिनेते प्राण यांचा आहे. या फोटोत प्राण हुबेहुब एखाद्या महिलेसारखे दिसत आहेत. या फोटोवर कुमारी प्राण असे देखील लिहलेले आहे. या फोटोवर एका चाहत्याने कमेंट केली असून त्यात त्याने हा फोटो प्राण यांच्या मोठ्या भावाच्या लग्नातील असल्याचे सांगितले आहे. ‘प्राण यांनी मोठ्या भावाच्या लग्नात महिलेचा वेष धारण केला होता. त्यांनंतर ते भावाच्या नव्या नवरी भावाची गर्लफ्रेंड बनून गेले होते. त्यावेळी हा फोटो काढलेला असल्याचा दावा या चाहत्याने केला आहे. तसेच प्राण यांनी शिमला येथे रामलिलेत सीतेची भूमिका केल्याचेही त्याने सांगितले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या