मनाची तयारी केलीय, मलाही कुणी खांदा देणार नाही!, नव्या हीरोंवर ऋषी कपूर भडकले

20

सामना ऑनलाईन, मुंबई

सोशल मीडियावर ‘खुल्लम खुल्ला’ बोलण्यासाठी प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांनी विनोद खन्ना यांच्या अंत्यदर्शनाकडे पाठ फिरवणाऱ्या नव्या पिढीतील हीरोंचा खरपूस समाचार घेतला आहे. ही खूप लाजिरवाणी बाब असून मीही मनाची तयार केलीय की मला कुणी खांदा द्यायला येणार नाही, अशा स्पष्ट शब्दांत ऋषी कपूर यांनी संताप व्यक्त केला.

विनोद खन्ना यांच्या पार्थिवावर गुरुवारी वरळी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले. यावेळी जुन्या पिढीतील कलाकार आणि विनोद खन्ना यांचे सहकलाकार उपस्थित होते. मात्र आजच्या काळातील अभिनेते आले नाहीत. त्यावरून ऋषी कपूर चिडले. त्यांनी ट्विटरवर भावना व्यक्त केल्या. स्वत:ला स्टार म्हणवून घेणाऱ्यांचा खूप राग आलाय, असे ट्विट त्यांनी केले. आपल्या अंत्यसंस्कारालाही कुणी येणार नाही, याबाबत मनाची तयारी झाल्याचा सणसणीत टोला हाणला. गुरुवारी बिग बी अमिताभ बच्चन, गुलजार, कबीर बेदी, रणजित, रणधीर कपूर, ऋषी कपूर, चंकी पांडे, उदीत यांच्यासह अभिषेक बच्चन, दीया मिर्झा, रणदीप हुडा अशी मोजकी नवीन कलावंत मंडळी विनोद खन्ना यांना अखेरचा निरोप द्यायला हजर होती.

त्याच्यासारखा तोच! बिग बी झाले भावुक

त्याचे हसणे, त्याचे राहणे, त्याचे चालणे….. सारेच ऐटबाज. गर्दीत तो स्वतःची छाप सोडायचा. त्याला कुणीही डिस्टर्ब करू शकत नव्हते. त्याच्यासारखे दुसरे कुणीच असूच शकत नाही, अशा शब्दांत बिग बी अमिताभ बच्चन यांनी विनोद खन्ना यांच्या आठवणी जागवल्या. अमिताभ यांनी amitabh-bachchanविनोद खन्नावर आज खास ब्लॉग लिहिला. सुनील दत्त यांच्या ऑफिसात १९६९ साली झालेल्या पहिल्या भेटीचा प्रसंग अमिताभ यांनी लिहिला. ‘रेश्मा और शेरा’ या चित्रपटासाठी पहिल्यांदा भेटलो तेव्हा एक देखणा चेहरा माझ्याकडे बघून स्मितहास्य करीत होता, असे अमिताभनी लिहिलेय. त्यासोबत ४८ वर्षांच्या मैत्रीत मेकअप रूममध्ये घा
लवलेला वेळ, एकत्र लंच, एकत्र ड्रिंक, जुहूच्या समुद्रावर मध्यरात्री भटकणे अशा अनेक आठवणींचा जागर अमिताभनी ब्लॉगवर केला.

आपली प्रतिक्रिया द्या