जयदेव उनादकटची हॅट्रिक, पुण्याची हैदराबादवर चढाई

13

सामना ऑनलाईन । हैदराबाद

हैदराबादच्या राजीव गांधी आंतराष्ट्रीय मैदानावर पुणे आणि हैदराबाद संघात झालेल्या सामन्यात पुण्यानं हैदराबादचा १२ धावांनी पराभव केला आहे. पुण्याचा युवा वेगवान गोंलदाज जयदेव उनादकटनं हॅट्रिकची नोंद केली. युवराजनं ४७ धावा करत हैदराबादला विजयी करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. कर्णधार डेव्हिड वॉर्नरनं ४० धावा केल्या. मात्र इतर फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. पुण्याकडून वेगवान गोलंदाज जयदेव उनादकटनं ५, ब्रेन स्ट्रोक्सनं ३ आणि इम्रान ताहिरनं एक बळी मिळवला.

त्याआधी पुण्यानं प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ८ बाद १४८ अशी मर्यादीत धावसंख्या उभारली. पुण्याकडून स्ट्रोक्सनं सर्वाधिक ३९ धावा केल्या. स्मिथनं ३४, धोनीनं ३१ आणि रहाणेनं २२ धावांचे योगदान दिलं. हैदराबादच्या एस कौलनं ४ बळी मिळवले. रशिद खान आणि बिपूल शर्माला प्रत्येकी एक बळी मिळाला.

आपली प्रतिक्रिया द्या