रितेश देशमुख पुन्हा एकदा दिसणार मराठी चित्रपटात

बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख पुन्हा एकदा मराठी चित्रपटात झळकणार आहे. रितेश तीन वर्षानंतर आपल्याला मराठी चित्रपटात दिसणार आहे. अदृश्य असे त्या चित्रपटाचे नाव असून तो एक थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटात प्रमुख भूमिकेत पुष्कर जोग, मंजिरी फडणीस आणि एका महत्वपूर्ण भूमिकेत रितेश देशमुख आहेत.

बॉलिवूडचे प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर कबीर लाल ज्यांनी आज पर्यंत ताल , परदेस , कहो ना प्यार है , वेल कम बॅक इत्यादी सारख्या अनेक हिंदी चित्रपटांच्या सिनेमॅटोग्राफीची धुरा यशस्वीपणे सांभाळली आहे, आता ते प्रथमच दिग्दर्शन करत असून त्यांनी दिग्दर्शित केलेला पहिला मराठी चित्रपट अदृश्य लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

विशेष बाब म्हणजे कबीर लाल आणि रितेश देशमुख 20 वर्षानंतर परत एकदा एकत्र काम करत आहेत , रितेश चा पहिला सिनेमा तुझे मेरी कसम चे सिनेमॅटोग्राफर कबीर लाल हे होते या विषयी रितेश म्हणतो मी चित्रपटांत काम करतो याचे कारण कबीर लाल हेच आहेत … सुभाष घई यांच्या चित्रपटाच्या सेट वर शूटिंग बघायला मी गेलो होतो त्यावेळेस माझी आणि कबीर लाल यांची भेट झाली कदाचित त्यावेळीच त्यांना असे वाटले असेल कि मला ऍक्टर बनायचे आहे , पुढे तुझे मेरी कसम चित्रपटासाठी त्यांनी माझे नाव सुचवले आणि त्याच फिल्म ने माझ्या फिल्मी करिअर ला सुरवात झाली …

रितेश पुढे म्हणतो 20 वर्षांनंतर पुन्हा एकदा कबीर लाल यांच्या सोबत काम करतांना मला खूप छान वाटत आहे आणि ते मराठी फिल्म चे दिग्ददर्शन करत आहेत आणि त्याचा मी भाग आहे हि गोष्ट माझ्या साठी अत्यंत आनंदाची बाब आहे .

पुष्कर जोग आणि मंजरी फडणीस यांच्या सह सौरभ गोखले , अनंत जोग , अजय कुमार सिंह हे अभिनेते या चित्रपटात आहेत . साहिद लाल यांनी या चित्रपटाच्या सिनेमॅट्रोग्राफीची धुरा सांभाळली आहे , लवली वर्ल्ड एंटरटेनमेंट या बॅनर खाली चित्रपटाची निर्मिती अजय कुमार सिंह यांनी केली आहे . चित्रपटाची शूटिंग पूर्ण झाली असून लवकरच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येईल

आपली प्रतिक्रिया द्या