‘1 महिन्यांत 19 लाख बेरोजगारांना रोजगार न मिळाल्यास आंदोलन करू’, तेजस्वी यादव यांचा नितीश सरकारला इशारा

बिहारचे विरोधीपक्ष नेते तेजस्वी यादव यांनी नितीश सरकारवर हल्लाबोल केला आहे. तेजस्वी यादव म्हणाले आहे की, ‘1 महिन्याच्या आत 19 लाख बेरोजगारांना रोजगार न मिळाल्यास आम्ही रस्त्यावर उतरून ‘जन आंदोलन’ करू.’

बिहार विधानसभेच्या बाहेर पत्रकारांशी बोलताना तेजस्वी म्हणाले की, ‘नितीश कुमार भीष्म पितामह आहेत, 15 वर्षात 60 मोठे घोटाळे झाले आहेत. भ्रष्टाचाऱ्यांना वाचवणे हा नितीश कुमार यांचा स्वभाव आहे.’

तेजसवी पुढे म्हणाले, जनता दल युनायटेड (जेडीयू) बिहारमध्ये चोरून सत्तेत आली आहे. बिहारमध्ये नितीश कुमार यांचा पक्ष तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे. आरजेडी सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या