आर.के.एस. भदौरिया हवाई दलप्रमुख

188

एअर व्हाईस चीफ एअर मार्शल आर.के.एस. भदौरिया यांची नवे हवाई दलप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्याने आज याची माहिती दिली. सध्याचे हवाई दलप्रमुख बी.एस. धनोआ हे 30 सप्टेंबरला निवृत्त होत आहेत. भदौरिया यांनी मे महिन्यात व्हाईस चीफचा पदभार स्वीकारला होता. भदौरिया हे एनडीएचे विद्यार्थी आहेत. त्यांनी 15 जून 1980 साली हवाई दलाच्या लढाऊ विमानांचे वैमानिक म्हणून कार्यभार स्वीकारला.

आपली प्रतिक्रिया द्या