रस्त्याच्या बाजूला मुला-मुलीचे मृतदेह, अपघात की घातपात? गूढ कायम

31

सामना ऑनलाईन । पेण

पेण-खालापूर मार्गावरील धामणी गावाच्या रस्त्याच्या जवळ असलेल्या एका निर्जन जागेवर एका दूचाकी जवळ एका मुलाचा आणि मुलीचा मृतदेह आढळून आला. मृतदेहांची अवस्था लक्षात घेता ही घटना दोन ते तीन दिवसांपूर्वी घडली असण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. मृतदेहाची ओळख अद्याप पटली नसून हा अपघात आहे की घातपात? याचा तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पेण-खालापूर मार्गावरील धामणी गावाजवळच्या वळणावर रस्त्याच्याकडेला असलेल्या निर्जन जागेत एक दूचाकी पडल्याचे वाटसरूंना आढळले. तसेच मुला-मुलीचा मृतदेह दिसला. त्यांनी माहिती देताच तपास सुरू करण्यात आला. या मृतदेहांची अवस्था पाहाता ही घटना दोन-तीन दिवसांपूर्वीची असल्यासारखे वाटते. मृतदेहाचे प्राण्यांनी लचके तोडल्याचेही दिसून येत आहे. त्यामुळे मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम अधिक कठीण झाले आहे. मात्र हा अपघाती मृत्यू आहे की घातपात हे संपूर्ण तपासाअंती सांगता येईल, असेही सांगण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या