रस्ते वाहतूक असुरक्षित.. दरवर्षी रस्ते अपघातात दीड लाख लोकांचा मृत्यू

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

देशभरात दरवर्षी रस्ते अपघातात दीड लाख लोक मृत्युमुखी पडत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक नितीन गडकरी यांनी ही माहिती गुरुवारी लोकसभेत दिली. गेल्या तीन वर्षांची आकडेवारीनुसार यामध्ये ४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. एकंदर परिस्थिती पाहता देशातील रस्ते मृत्यूचे रस्ते ठरत आहेत.

रस्त्यावरील अपघातांची सख्या जवळपास पाच लाख आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी आणि रस्ते वाहतूक अधिक सुरक्षित करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचे गडकरी यांनी सांगितले. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून यावेळी १ लाख २६ हजार २३३ भुयारी बोगद्यांसह देशातील एक लाख ६२ हजार पुलांचे सर्वेक्षण करण्यात आले. यातील १४७ पूल कमकुवत झाले असल्याचे निदर्शनात अाले आहे. जे पूल कमकुवत किंवा मोडकळीस आले आहेत, त्यांची दुरुस्ती किंवा पुर्नबांधणी करण्याचे आदेश गडकरी यांनी संबधित विभागाला दिले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या