कोपरगाव रस्त्यावरील खड्ड्यांची थातूरमातूर मुरूमपट्टी ठरतेय जीवघेणी

234
कोपरगाव नगरपालिका प्रशासनाने डांबर मिश्रित खडी टाकून रस्ते मजबूत करण्याऐवजी अनेक ठिकाणी माती मिश्रीत खडी टाकल्याने पावसात माती वाहून गेली आणि खडी वर आली. या खडीनेच शहरातील प्रतिष्ठित नागरिक मंदार आढाव यांच्या डोळ्याला इजा झाल्याचा दावा करण्यात येत आहे.

मुसळधार पावसात  शहराच्या रस्त्यावरील  खड्डे जीवघेणे ठरत आहेत. या खड्ड्यातून वाहतुक करणे जिकीरीचे बनले आहे. आतापावसाने उघडीप दिल्याने नगरपालिकेने खड्डे भरण्याची मोहिम सुरु केली आहे. मात्र या खड्ड्यात फक्त माती युक्त मुरुम टाकता खडी मिसळण्याची गरज आहे. तसेच योग्य दाबाने रोलींग केल्यानंतरच हे रस्ते वाहतुकीस योग्य बनतील. अन्यथा पावसात पाऊस आला धावून, रस्ते गेले वाहून पुन्हा खड्डे उघडे पडून चिखलाने निसरडे रस्ते  बनण्याची धोका आहे.

गुणवत्ता न राखल्याने शहरातील रस्ते खड्ड्यात गेले आहेत. थोडयाफार  पावसात देखील शहरातील रस्त्यावरील खड्डे जीवघेणे ठरत आहेत. या खड्ड्यातून वाहतुक करणे जिकीरीचे बनले आहे. आतापावसाने उघडीप दिल्याने सणासुदीच्या काळात नागरिकांचा रोष कमी करण्यासाठी नगरपालिका प्रशासनाने प्रमुख रस्त्यांवरील खड्डे भरण्याची मोहीम हाती घेतल, पण हे खड्डे मुरूमाने भरले जात असल्याने एखादा पाऊस आला की पुन्हा खड्डे उघडे पडणार आहेत. त्यामुळे या थातूरमातूर मुरूमपट्टीचा उपयोग कुणाला ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. यंदाच्या पावसाळ्यात शहरातील सर्वच प्रमुख रस्त्यांची पुरती वाट लागली आहे. व्हाइट टॉपिंग आणि सिमेंटच्या रस्त्यांनी काहीसा दिलासा मिळाला आहे, पण जे रस्ते डांबराचे आहेत तिथे तर खड्ड्यातून वाट काढताना वाहनधारकांची अडचण होत आहे. अनेकांना पाठीचे, मानेचे आजार जडले आहेत.

सणासुदीच्या काळात तरी किमान नागरिकांना दिलासा मिळावा, यासाठी नगरसेवकांनी प्रशासनाकडे रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी मागणी केली होती. त्याची दखल घेत धारणगाव रोड, गांधीनगर, तेरा बंगले, येवला रोड, मेन रोड परिसरातील प्रमुख रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची मोहीम हाती घेण्यात आली.

मात्र या खड्ड्यात फक्त मातीयुक्त मुरुम न टाकता खडी मिसळण्याची गरज आहे. तसेच योग्य दाबाने रोलींग केल्यानंतरच हे रस्ते वाहतुकीस योग्य बनतील. अन्यथा पावसात पुन्हा खड्डे उघडे पडून रस्ते डर्टट्रॅक बनण्याची धोका आहे. डांबर मिश्रित खडी टाकून मजबूत करण्याऐवजी अनेक ठिकाणी मुरूम टाकून खड्डे बुजविले आहेत. त्यावरून एखादे जड वाहन गेले की मुरूम उडून जात आहे. आता पुढच्या दोन – तीन दिवसांत जर एखादा मोठा पाऊस आला तर उर्वरित खड्ड्यांमधील मुरूम वाहून जाऊन खड्डे पुन्हा उघडे पडण्याची भीती आहे. मुरूम टाकून दोन दिवस झाले नाही तोच  वाहनांच्या वर्दळीमुळे खड्ड्यातील मुरुमाची  माती होऊन धुळीचे लोट गाडीच्या मागे उठत आहेत त्यामुळे गेल्या दीड वर्षापासून धुळ मुक्त झालेल्या कोपरगाव करांना पुन्हा धुळीचा सामना करावा लागत आहे आधीच कोपरगावात साथीच्या आजाराने थैमान घातले असून त्यात धुळीचा त्रास यामुळे कोपरगावकर पुरते हैराण झाले आहेत.

या थातूरमातूर मुरूमपट्टीचा फायदा नागरिकांना की कंत्राटदाराला असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

शहर हद्दीतील सर्व रस्त्यांचे ऑडिट करून रस्त्यांवर फलक लावून त्यावर स्त्याचे नाव, कोणत्या निधीतून केला त्याचे नाव, रस्त्याचे बजेट, ठेकेदाराचे नाव, देखरेख करणार्‍या अधिकार्‍यांचे नाव तसेच रस्त्यांची आयुष्यमान नमूद  करण्याची पद्धत आहे, अशी मागणी अनेक वेळा झाली. मात्र, नगरपालिका प्रशासनाने याकडे कायमपणे डोळेझाक भूमिका घेतली. नव्या कायद्यानुसार  डांबरीकरण रस्त्याचे तीन वर्ष देखभाल दुरुस्ती डागडुजी ठेकेदारांनी करायची असते, असे असतानाही पालिकेकडून ठेकेदाराला याबाबत नोटिसा दिल्या जात नाही किंवा नोटिसा दिल्या नोटीस दिल्यानंतर ठेकेदार त्यांना जुमानत नाही. पालिका प्रशासनाकडून ठेकेदारांबाबत ठोस भूमिका घेतली जात नाही. परिणामी, नेमका रस्ता कधी केला, त्याच्या डागडुजीची जबाबदारी कोणाची, हे गुलदस्त्यात राहते. रस्त्यावरील  खड्ड्यात मुरूम टाकण्यात आला आहे. शहरातील बहुतांश भागातील रस्त्यांच्या खड्ड्यांची परिस्थिती अशीच असल्याने कोपरगावकरांचे  हाल थांबण्याची शक्यता कमीच आहे.

नगरपालिकेने धारणगाव डांबरी रस्त्यावरील खड्डे मुरूम पट्टीने बुजविले खरे मात्र दोनच दिवसात या मुरुमाची माती झाल्याने उडणाऱ्या धुळीमुळे प्रतिष्ठित नागरिक मंदार आढाव यांच्या डोळ्याला इजा झाल्याचा दावा करण्यात येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या