रोडीज फेम रघू रामने दिला बायकोला घटस्फोट

49

सामना ऑनलाईन । मुंबई

प्रसिद्ध रिअॅलिटी शो ‘रोडीज’ मधला माजी परिक्षक रघू राम याने त्याची पत्नी सुंगधा गर्गला घटस्फोट दिला आहे. गेली दोन वर्ष दोघे एकमेकांपासून वेगळे राहत होते. रघूने बायकोसोबत घटस्फोट घेतल्याचे आज सोशल मीडियावरून जाहीर केले. मात्र हे जाहीर करताना त्याने सुगंधासाठी एक भावनिक पोस्टही शेअर केली आहे.

“सुगंधा, काही गोष्टी कधीच बदलत नाहीत. जसं की माझं तुझ्यावर असलेलं प्रेम. ते देखील कधीच बदलणार नाही. आपण एकत्र असताना केलेली मजामस्ती. या सर्व गोष्टी कधीही संपत नाहीत. आता आयुष्यातल्या नव्या वळणाला सुरुवात होतेय.” अशी पोस्ट रघूने इंस्टाग्रामवरून शेअर केली आहे. या पोस्टसोबत त्याने त्यांच्या लग्नाचा आणि दोघांचा एकत्र आनंदी क्षण असलेला फोटो शेअर केला आहे. रघूने या पोस्टला फ्रेन्डशिप गोल्स आणि डायव्हॉर्स गोल्स असे दोन हॅशटॅगही दिले आहेत.

रघू आणि सुगंधाचे २ मे २००६ रोजी लग्न झाले होते. तब्बल दहा वर्ष एकमेकांसोबत संसार केल्यानंतर २०१६पासून ते वेगळे राहत होते. काही दिवसांपूर्वीच रघूने तो आणि सुंगधा घटस्फोट घेणार असल्याचे जाहीर केले होते. तसेच घटस्फोटानंतरही आम्ही चांगले मित्र नक्कीच राहू असेही त्याने स्पष्ट केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या