दरोडेखोरांनी महिलेची हत्या करून लुटलं २४ तोळं सोनं

सामना ऑनलाईन । कोल्हापूर

कोल्हापूरकरांसाठी आठवड्याची सुरुवात एका धक्कादायक घटनेनं झाली आहे. कोल्हापूरातील उदगावमध्ये दरोडेखोरांच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाला आहे. अरूणा निकम असं या मृत महिलेचं नाव आहे. या हल्ल्यात बाबुराव निकम हे देखील गंभीर जखमी झाले आहेत.

निवृत्त प्राध्यपक बाबुराव निकम यांच्या घरावर काल दरोडा पडला. यावेळी दरोडेखोरांनी निकम यांच्या घरातून २४ तोळे सोनं आणि ५० हजारांची रोकडही लंपास केली आहे. या संपूर्ण घटनेमुळे परिसरात दहशतीचं वातावरण आहे.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात…