पीपीई कीटधारी चोरट्यांनी ज्वेलर्सला लुटले

429

सातारा येथे पीपीई कीट, मास्क, हँडग्लोव्हज घातलेल्या तीन चोरट्यांनी पहाटे दोनच्या सुमारास हिरालाल कांतीलाल यांच्या ज्वेलरी शॉपमध्ये घुसून चोरी केली. चोरट्यांनी भिंतीला भगदाड करून दुकानात प्रवेश केला. ७८० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने त्यांनी चोरले. पहाटे दोन वाजता ही घटना घडली. चोरटे सीसीटीव्हीमध्ये वैâद झाले परंतु मास्कमुळे त्यांचे चेहरे पोलिसांना ओळखता आलेले नाहीत. त्यामुळे पोलीस तज्ज्ञांची मदत घेत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या