पोलिसांच्या गणवेशात सराफी दुकानावर दरोडा, खेड शिवापूर मधील घटनेने खळबळ

1354

पोलिसांच्या गणवेशात खेड शिवापूर भागात एका सराफी दुकानात भरदिवसा दरोडेखोरांच्या टोळीने घुसून गोळीबार करत सोने लुटून नेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. सुदैवाने घटनेत कोणालाही गोळी लागली नसल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी खेड शिवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खेड शिवापूर परिसरात कापूरहोळ गावाजवळ बालाजी ज्वलर्स दुकान आहे. आज संध्याकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास अचानक एका मोटारीमधून पोलिसांचा गणवेश घालून दरोडेखोर सराफी दुकानात आले. त्यांनी दुकान लुटण्याचा प्रयत्न केला. येथील एकाने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. दरोडेखोराने गोळीबार करून तेथून पळ काढला. मात्र सुदैवाने यात गोळी लागली नाही.

img-20200806-wa0024

दरोडेखोर पसार होताच याची माहिती पोलिसांना देण्यात आली. स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. यात नेमके सोने किती लुटून नेण्यात आले हे समजू शकलेले नाही. दरोडेखोर चारचाकीत पसार झाले असल्याने ठिकठिकाणी नाकाबंदी करून पोलिसांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. पुणे पोलिसांना देखील माहिती देण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या