नांदगावात सशस्त्र दरोडेखोरांनी तीन घरांमधून ७७ हजार लुटले

17
फोटो प्रातिनिधीक

सामना प्रतिनिधी, नाशिक

नांदगाव येथे चार दरोडेखोरांनी तीन घरांमध्ये घुसून शस्त्रास्त्रांचा धाक दाखवून रोख रक्कम व दागिने असा ७७ हजारांचा ऐवज लुटला, या घटनेमुळे परिसरात घबराट पसरली आहे.

जुन्या पंचायत समिती परिसरात रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास एका सशस्त्र टोळक्याने अक्षरशः धुडगुस घातला. सवादोन वाजता ही टोळी बाळासाहेब श्रावण सोनज यांच्या घराचा दरवाजा तोडून आत घुसली, त्यांच्या आवाजाने सोनज जागे झाले, त्यांना चाकूचा धाक दाखवत दोन तोळ्याची सोन्याची चेन दरोडेखोरांनी ओरबाडून घेतली, यात सोनज जखमी झाले आहेत.

त्यानंतर दरोडेखोरांनी जवळील राजेंद्र निवृत्ती पाटील यांच्या घराकडे मोर्चा वळविला. त्यांच्या घरातून २३ हजार ६०० रुपयांचे सोन्याचे दागिने लुटले त्यानंतर जनार्दन कृष्णा पगार यांच्या घराचा दरवाजा तोडून त्यांनी चार हजार रुपये पळविले. याप्रकरणी नांदगाव पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान या टोळीला नगर जिह्यातील नेवासे येथे पकडण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या