विकृत! चड्डीचोर न्यायाधीशाने कबूल केला गुन्हा

शेजारी राहणाऱ्या महिलेच्या घरात चोरीच्या उद्देशाने घुसलेल्या न्यायाधीशाने महिलेची अंतर्वस्त्र चोरल्याचे न्यायालयात कबूल केले आहे. रॉबर्ट चिकाले असं या न्यायाधीशाचे नाव असून आता त्याला चोरीच्या आरोपाखाली शिक्षा होणार आहे.

रॉबर्ट चिकाले ( 50 वर्षे) यांनी ईस्ट आयस्लिप भागात असलेल्या डोना प्लेसमधल्या महिलेच्या घरातून तिची अंतर्वस्त्र चोरल्याचे कबूल केले आहे. 29 मार्च 2018 रोजी रॉबर्ट या महिलेच्या घरात शिरला होता. चोरी करत असताना त्याला महिलेचा आवाज आला, ज्यामुळे घाबरून तो पळून गेला. महिलेला जेव्हा कळालं की आपल्या घरातून अंतर्वस्त्र चोरीला जात आहेत, आणि घरात पुन्हा चोरीचा प्रयत्न झालाय तेव्हा तिने पोलिसांना कळवलं. पोलिसांनी केलेल्या तपासात रॉबर्ट चिकालेचं नाव मुख्य संशयित म्हणून पुढे आलं. पोलिसांनी जेव्हा रॉबर्टच्या घराची झडती घेतली तेव्हा त्यांना महिलांची अनेक अंतर्वस्त्र त्याच्या घरात सापडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रॉबर्टच्या सूटमध्ये तसंच त्याच्या रेनकोटमध्येही महिलांची अंतर्वस्त्र सापडली आहे. पोलिसांना पुरावा मिळाल्याने त्यांनी रॉबर्टला अटक केली. जेव्हा रॉबर्टला न्यायालयात उभं केलं तेव्हा त्याने या महिलेच्या घरात अनेकदा घुसून अंतर्वस्त्रांची चोरी केल्याचं कबूल केलं. रॉबर्टला 15 नोव्हेंबरला शिक्षा सुनावली जाणार असून त्याला कमीतकमी 5 वर्षांची शिक्षा होण्याची शक्यता आहे. चिकाले हा सफोल्क सत्र न्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणून काम करत होता. त्याला अटक झाल्यानंतर त्याला सेवेतून निलंबित करण्यात आलं होतं.

 

आपली प्रतिक्रिया द्या