वढेरा यांना हरयाणा सरकारचा झटका

836
robert-vadra

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांचे पती आणि उद्योजक रॉबर्ट वढेरा यांना हरयाणा सरकारने जबरदस्त झटका दिला आहे. त्यांच्या स्कायलाइट हॉस्पिटॅलिटीला सरकारने एक जमीन विकसित करण्यासाठी दिली होती. त्यासाठीचा परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सरकारने सुरू केली आहे. याप्रकरणी सरकारने वढेरा यांना नोटीस बजावून त्यांची बाजू मांडण्याची संधीही दिली होती. ही प्रक्रिया आता पूर्ण झाली असून सरकारने याप्रकरणी ठोस निर्णय घेण्याच्या दृष्टीने पावले उचलल्याची माहिती राज्याच्या शहर आणि ग्रामविकास विभागाचे संचालक एम. पांडुरंग यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या