रायफल्स घेऊन पळालेला पोलीस हिजबुलमध्ये

10

सामना ऑनलाईन, श्रीनगर

जम्मू कश्मीरमधील बुडगाम जिल्ह्यातल्या पोलीस ठाण्यातील चार रायफल पळवून नेणारा पोलीस हवालदार हिजबुल मुज्जाहिद्दीन या दहशतवादी संघटनेत सामील झाला आहे. सय्यद नावीद मुस्तफा असे त्या हवालदाराचे नाव असून शनिवारी तो पोलिसांच्या गोडाऊनमधील चार मोठ्या रायफल घेऊन पळून गेला होता.

गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार मुस्तफाने हिजबुल मुजाहिद्दीनशी हातमिळवणी केली होती. त्यामुळे तो जमेल तितक्या रायफल घेऊन पळून जाण्याच्या तयारीत होता, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या