
सामना ऑनलाईन । जकार्ता
आशियाई क्रीडा स्पर्धेत हिंदुस्थानच्या रोहन बोपन्ना आणि दिवीज शरन यांनी टेनिस पुरुष दुहेरीच्या अंतिम सामन्यात कझाकस्तानच्या जोडीला हरवत सुवर्ण पदक पटकावले आहे. या दोघांनी 6-3, 6-4 अशा सरळ सेटमध्ये विजय मिळवला आहे. या दोघांच्या विजयामुळे आता हिंदुस्थानच्या खात्यात सहा सुवर्ण पदके झाली आहेत.
हिंदुस्थानची ‘नौका’ पार… पटकावलं 1 सुवर्ण, 2 कांस्य
Tennis Men’s Doubles: Rohan Bopanna/Divij Sharan win gold medal after defeating Kazakhstan pair in the finals 6-3 6-4 #AsianGames2018 pic.twitter.com/meecq3gJlk
— ANI (@ANI) August 24, 2018
आज हिंदुस्थानचे रोहन बोपन्ना आणि दिवीज शरन यांची सुवर्ण पदकासाठी कझाकस्तानच्या बुबलिक अलेक्झांडर आणि देनिस येवसेयेव यांच्यात लढत झाली. रोहन आणि दिवीजने पहिला सेट 6-3 ने जिंकून सामन्यावर पकड घेतली. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये देखील रोहन आणि दिवीजने 6-4 ने सामना जिंकत सुवर्ण पदक पटकावले.
summary : Rohan Bopanna and Divij Sharan win gold medal after defeating Kazakhstan pair in the finals 6-3 6-4 in Tennis Men’s Doubles