प्रेमात अडथळा बनलेल्या तरुण मुलाचा खून केला, महिला आणि पोलीस अधिकाऱ्याला जन्मठेपेची शिक्षा

murder-knife

घटस्फोट झालेल्या आणि तीन मुलांची आई असलेल्या महिलेचे पोलीस अधिकाऱ्यासोबत प्रेमसंबंध जुळले. हा अधिकारी विवाहीत आहे आणि त्यालाही दोन मोठी मुलं आहेत. प्रेमात पागल झालेल्या या दोघांना कसलंच भान राहिलं नव्हतं. प्रेमाची नशा डोक्यात शिरल्याने आणि प्रेयसीचा मुलगा अडथळा बनल्याने शिवाजी नरवणे (62 वर्षे) याने त्याचा खून केला. या खुनाच्या कटामध्ये नंदा (50 वर्षे) या देखील सामील असल्याचं सिद्ध झाल्याने या दोघांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचे सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले आहे.

2013 सालची ही घटना आहे. टिळनगर भागात नंदा ही तिची दोन मुले म्हणजेच रोहन आणि रुषभ तसेच मुलही नेहा यांच्यासोबत राहात होती. नंदा ही घटस्फोटीत आहे. नंदाचे शिवाजी नरवणे याच्याशी अनैतिक संबंध होते. या संबंधांचा रोहनला प्रचंड राग होता. 24 ऑक्टोबर 2013 रोजी रोहनचं नंदाशी कडाक्याचं भांडण झालं. हे भांडण झालं तेव्हा त्याची दोन्ही भावंडं, मित्र आणि शिवाजी नरवणे हे सगळे जण घरात होते. या भांडणामुळे नंदा तिच्या नातेवाईकाच्या घरी निघून गेली. काही वेळाने रोहनची भावंडे आणि मित्रही निघून गेले. रोहन आणि शिवाजी नरवणे हे दोघेच जण घरी राहिले होते. रात्रीच्या सुमारास घरी कोणी नसल्याचा फायदा उचलत नरवणेने रोहनची गळा चिरून हत्या केली. पहाटे चार वाजता त्याने नंदाला फोन केला आणि मगच घरातून पळ काढला. हत्येच्या दुसऱ्याच दिवशी नंदाला अटक करण्यात आली. तिच्या चौकशीमध्ये नरवणेचंही नाव पुढे आल्याने त्यालाही अटक करण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या