विकतचे श्राद्ध

348

>>दि. मा. प्रभुदेसाई<<

कोणताही कुठलाही मुसलमान म्हटले की अनेकांना प्रेमाचा पान्हा फुटतो, सर्वधर्मसमभावाचा उमाळा येतो, ‘हे विश्वचि माझे घर’ असे म्हणणारे संत ज्ञानेश्वर आपल्या अंगात संचारल्याचा त्यांना भास होतो! सध्या म्यानमारमधून हाकलून दिलेल्या रोहिंग्या मुसलमानांबाबत आपल्या देशात हेच सुरू आहे. म्हणून एका लोकप्रतिनिधीने ‘तस्लिमा बहीण म्हणून चालते तर रोहिंग्या भाऊ म्हणून का चालत नाही?’ असा प्रश्न विचारला आहे. आपण कुणाची तुलना कुणाशी करत आहोत याचे भान त्याला नाहीच, पण तस्लिमा एकच आहे. रोहिंग्या झुंडीने घुसत आहेत याचाही विचार त्यांनी केलेला दिसत नाही. कायदेशीरपणाची बाब वेगळीच. आपल्या देशात घुसलेल्या रोहिंग्यांची संख्या ४० हजार असल्याचा अधिकृत आकडा आहे. तो ४० लाखांवर कधी जाईल ते आपल्या कळणारही नाही आणि मग जिथे मुसलमान बहुसंख्य होतात तिथे कायदा आणि सुव्यवस्थेबाबत काय मानसिकता राहते, सुरक्षा कशी धोक्यात येते हे आपल्याला मुंबईतही अनुभवायला मिळते. संयुक्त राष्ट्र संघाला ‘परस्पर हलवायाच्या  घरावर तुळशीपत्र ठेवायला’ काय जाते? खरे म्हणजे या घुसखोर रोहिंग्यांना मुस्लिम देशांतच सामावून घेतले पाहिजे. म्हणजे एकाच धर्मामुळे, एकाच संस्कृतीमुळे ते त्या देशाशी लवकर एकरूप होतील! काश्मिरी पंडित आपल्याच देशांत निर्वासित झालेले आहेत याचा मानवतेच्या दृष्टीने कोणी विचार करतो का? राष्ट्रहितापुढे मानवता, माणुसकी हे मुद्दे अशावेळी गौण ठरतात. म्हणून सरकारने न्यायालयात सादर केलेले प्रतिज्ञापत्र अत्यंत योग्य असून त्यावर ठाम राहिले पाहिजे. ‘घरचे झाले थोडे आणि व्याह्याने धाडले घोडे’ अशी आपली स्थिती असल्याचे न्यायालयाला सांगायला हवे. घुसखोर मुस्लिमांना आपण थारा का देत नाही याचे उत्तर म्यानमार तसेच युरोपातील काही देशांनी स्पष्टपणे दिलेले आहे.  धर्मांध मुसलमानांनी परधर्मसहिष्णू होणे हा या समस्येवरील एकमेव उपाय आहे.

आपली प्रतिक्रिया द्या